नवी दिल्ली, 04 डिसेंबर: पोस्टाच्या बचत योजना बऱ्याच लोकप्रिय आहेत. तुमच्या सोयीनुसार या योजनांपैकी काही योजना तुम्ही निवडू शकता. पोस्टाच्या योजनेतली गुंतवणूक फायद्याची ठरते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट, नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, नॅशनल सेव्हिंह टाइम डिपॉझिट अकाउंट, नॅशनल सेव्हिंग मंथली इनकम अकाउंट,सीनिअर सिटिनझ सेव्हिंग स्कीम अकाउंट,पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अकाउंट, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनांचा समावेश आहे.
या योजनेत सरकारची हमी असल्याने कमी काळात मोठी बचत होऊ शकते. जर तुम्हाला कमी काळात 1 कोटी रुपये वाचवायचे असतील तर पीपीएफ योजना आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना हे चांगले पर्याय आहेत.
कशी करणार 1 कोटी रुपयांची बचत?
पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात दर महिन्याला गुंतवणूक करता येते. ही योजना 15 वर्षांनी मॅच्युअर होते.नंतर 5-5 वर्षांनी तुम्ही ती पुढे नेऊ शकता. तुम्ही दरमहा 300 रुपयांची बचत केलीत तर 268 महिन्यांत 1 कोटी रुपयांची बचत करू शकता.
वाचा-खूशखबर! पुढच्या वर्षी भारतीयांना मिळणार सगळ्यात जास्त पगार
प्रत्येक दिवसाला वाचवा 300 रुपये
प्रत्येक दिवसाला 300 रुपये वाचवून एक वर्षात एकूण 1 लाख 9 हजार 500 रुपये वाचवू शकता. या योजनेत वर्षाला दीड लाख रुपये गुंतवता येतील.
दिवसाला 400 रुपये वाचवा, 1 कोटींची बचत करा
तुम्ही प्रत्येक दिवसाला 400 रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला 1 लाख 45 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. तुम्ही जेवढी लवकर गुंतवणूक कराल तेवढा जास्त फायदा मिळेल. या योजनांची माहिती पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
==========================================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा