पुढच्या 48 तासांत करा बँकेतील 'ही' महत्त्वाची कामं, अन्यथा खात्यातून काढता येणार नाहीत पैसे

पुढच्या 48 तासांत करा बँकेतील 'ही' महत्त्वाची कामं, अन्यथा खात्यातून काढता येणार नाहीत पैसे

30 नोव्हेंबरपर्यंत करा ही महत्त्वाची कामं, अन्यथा तुमचं होईल मोठं आर्थिक नुकसान.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. उद्या 5 वा शनिवार असल्यानं बँक आणि सरकारी कार्यालयं सुरू राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही तुमची बँक, पीएफ किंवा 'या' 5  महत्त्वाच्या गोष्टी केल्या नसतील तर आज आणि उद्या दोन दिवसांचा अवधी तुमच्याकडे आहे. जर ही कामं तुम्ही केली नाहीत तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.  30 नोव्हेंबरनंतर एसबीआयच्या नियमांपासून ते विमा कंपन्यांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. त्यासोबतच पंतप्रधान किसान समन्मान निधी योजनेचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी तुमचा आधारकार्ड नंबर दिला नसेल तर तो आताच देणं बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेताना अनेक अडथळे येऊ शकतात.

लाइफ सर्टिफिकेट जमा करणं का आवश्यक आहे?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर 30 नोव्हेंबर 2019 आधी तुम्हाला Life Certificate submission last date 30th November 2019 बँकेत सादर करणं आवश्यक आहे. सर्टिफिकेट जमा न केल्यास तुमचं पेन्शन अडवलं जाणार आहे. देशातील सर्वाधिक पेन्शनधारक हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक आहेत. त्यामुळे त्यांना पेन्शन घेण्यासाठी हे सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक आहे. बँकेच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 36 लाख पेन्शन खाती या बँकेत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्टिफिकेट सादर केलं नसेल तर तातडीनं करा आणि आपलं पेन्शन रोखलं जाणार नाही याची काळजी घ्या.

वाचा-WhatsAppमध्ये झाला सर्वात मोठा बदल! आता आपोआप डिलीट होणार तुमचे मेसेज

लाइफ सर्टिफिकेट जमा न केल्यास काय होईल?

तुम्ही तुमचं लाइफ सर्टिऱिकेट जमा केलं नाही तर तुमचं पेन्शन येणं बंद होणार आहे. पेन्शन खात्यात येण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तुम्हाला हे सर्टिफिकेट सादर करणं अत्यावश्यक आहे. हे तुम्ही ऑनलाइन जमा करू शकता. तुम्हाला त्यासाठी बँकेत किंवा पोस्टात जाण्याची आवश्यकता नाही.

डिजीटल सर्टिफिकेट कसं मिळवाल?

डिजीटल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना प्रमाण आयडी तयार करावा लागेल. प्रत्येक पेन्शनधारकासाठी हा आयडी वेगळा असतो. पेन्शनधारक आपल्या आधारनंबर आणि बायोमॅट्रीक पद्धतीनं हा आयडी तयार करू शकतो.

स्थानिक सीटीजन सर्विस सेंटरमध्ये पेन्शनधारकाचं आधारकार्ड, मोबाईल नंबर, पेंन्शन पेमेंट ऑर्डर नंबर, पेंन्शन खात्याचा नंबर, आणि बोटांचे ठसे देणं आवश्यक आहे. हे सगळं झाल्यानंतर मोबाईलवर एक मेसेज येतो. त्यामध्ये तुमचा आयडी दिलेला असतो.

https://jeevanpramaan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आयडीनंबर आणि इतर माहिती भरावी. याद्वारे तुम्हाला तुमचं लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन मिळवता येऊ शकतं.

तुम्हाला सहा हजार रुपये मिळण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणं आवश्यक आहे. लिंक नसेल तर तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे आजच आधार कार्ड लिंक करून घेण्यास विसरू नका.

वाचा-1 एप्रिलपासून बदलणार वीजपुरवठ्याचा हा नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

LIC पॉलिसी रिवाइव करण्याची अंतिम मुदत वाढली.

तुम्ही जर एलआयसी कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हा बदल महत्त्वाचा असणार आहे. LIC 30 नोव्हेंबरनंतर 24हून अधिक पॉलिसी बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या पॉलिसीसंदर्भात आवश्यक ती माहिती नजीकच्या एलआयसी ऑफिसमधून घ्या. अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. इंशुरन्स रेगुलेटरी IRDA ची लाइफ इंशुरन्स प्रोडक्टच्या नव्या गाइलसाईनुसार  LIC आपल्या काही जुन्या पॉलिसी बंद करणार आहे.

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख

CBDT ने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखला आयटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवून दिली होती. त्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर तिथली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा सेवा पूर्ववत करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आयटीरिटर्न भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. अडीच लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्यांना आयटी रिटर्न भरणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर आयटी रिटर्न भरलं नसेल तर या आठवड्यात आवश्य भरा अन्यथा दंड भरावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 10:03 AM IST

ताज्या बातम्या