पोस्टाच्या या योजनेचा दुहेरी लाभ, बचतही होणार आणि दर महिन्याला कमाईही

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत तर तुमची चांगली कमाईही होईल. बँकेत केलेलं एफडी किंवा डेट इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत तुम्हाला जास्त लाभ मिळतो.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2019 03:19 PM IST

पोस्टाच्या या योजनेचा दुहेरी लाभ, बचतही होणार आणि दर महिन्याला कमाईही

नवी दिल्ली : आपलं भविष्य सुरक्षित असावं यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. आपल्या कमाईचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले नाहीत तर ही कमाई वाया जाते. त्यामुळे गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसच्या या योजनेकडे पाहिलं जातंय.

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत तर तुमची चांगली कमाईही होईल.

हे होतील 4 फायदे

पोस्ट ऑफिसच्या या मंथली इनकम स्कीममध्ये कुणीही खातं उघडू शकतं. बँकेत केलेलं एफडी किंवा डेट इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत तुम्हाला जास्त लाभ मिळतो. दर महिन्याला निश्चित उत्पन्नही मिळतं आणि ही योजना पूर्ण झाली की सगळी रक्कम मिळते. ही रक्कम पुन्हा गुंतवली तर महिन्याभराच्या उत्पन्नाची सोय होते.

खातं कोण उघडू शकतं ?

Loading...

तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने खातं उघडू शकता. जर तुमचं मूल 10 वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल तर त्याच्या नावावर त्याचे पालकही हे खातं उघडू शकतात.

किती पैसे गुंतवाल ?

या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा करू शकता तर कमीत कमी 1500 रुपये जमा करता येतील.

महिन्याला किती रुपये मिळतील?

या योजनेत वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळेल. हे व्याज 12 महिन्यांमध्ये विभागलं जातं. तुम्ही जर 9 लाख रुपये जमा केले असतील तर वर्षाला तुम्हाला 65 हजार 700 रुपये मिळतील. दर महिन्याला 5 हजार 500 रुपयाचं उत्पन्न मिळेल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर 9 लाख रुपयांत आणखी काही बोनस जोडून पैसे मिळतील. ही योजना 5 वर्षांनी पूर्ण होते.

========================================================================================

VIDEO :..मग आमच्याकडे पर्याय उरत नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...