मराठी बातम्या /बातम्या /मनी /खात्यातून एकदाच कापले जाणार 12 रुपये, मात्र होणार 2 लाखांचा नफा!

खात्यातून एकदाच कापले जाणार 12 रुपये, मात्र होणार 2 लाखांचा नफा!

केंद्र सरकारने (Central Government) काही वर्षापूर्वी ही अत्यंत नाममात्र प्रीमियमची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे.

केंद्र सरकारने (Central Government) काही वर्षापूर्वी ही अत्यंत नाममात्र प्रीमियमची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे.

केंद्र सरकारने (Central Government) काही वर्षापूर्वी ही अत्यंत नाममात्र प्रीमियमची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे.

  मुंबई, 4 ऑगस्ट: कोरोना महामारीमध्ये (Corona Pandemic) लोक आरोग्य सुरक्षेबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळं जीवन विम्याचे (Life Insurance) महत्त्व वाढले आहे. लोक आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आयुर्विमा पॉलिसी घेत आहेत. हे प्रमाण वाढलं असलं तरीही आपल्या देशातील आर्थिक दुर्बल गटातील असंख्य लोकांना आजही विमा घेणं परवडत नाही. हातावर पोट असणाऱ्या किंवा अगदी तुटपुंज उत्पन्न असणाऱ्या लोकांना विम्याचा अगदी किमान हप्ता भरणंही शक्य होत नाही. कोरोना साथीनं तर परिस्थिती आणखी बिकट केली आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत विमा अत्यावश्यक असूनही लोक तो घेऊ शकत नाहीत. अशावेळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Surkasha Bima Yojana) (पीएमएसबीवाय -PMSBY) उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत अवघ्या 12 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये (Yearly Premium) 2 लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो.

  मे महिन्याच्या शेवटी जातो प्रीमियम :

  केंद्र सरकारने (Central Government) काही वर्षापूर्वी ही अत्यंत नाममात्र प्रीमियमची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. हा प्रीमियम दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी भरावा लागतो. तुम्ही या योजनेत सहभागी झाला असाल तर दरवर्षी 31 मे रोजी तुमच्या बँक खात्यातून (Bank Account) ही रक्कम आपोआप कापली जाते. त्यामुळं बँक खात्यात तेवढी शिल्लक असणं आवश्यक आहे.

  (हे वाचा:PF, PPF, VPF आणि NPS; रिटायरमेंटनंतरची टॅक्स फ्री परतावा देणारी गुंतवणूक  )

  नियम आणि अटी :

  18 ते 70 वर्षे वयोगटातील लोक या प्रधानमंत्री सुरक्षा विमा (पीएमएसबीवाय -PMSBY) योजनेचा लाभ घेऊ शकतात. पॉलिसी खरेदी करताना बँक खाते या योजनेशी जोडले जाते. ही विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास, त्याच्या वारसाला 2 लाख रुपये मिळतात.

  (हे वाचा: करदात्यांना दिलासा! CBDT ने वाढवली ITR इलेक्ट्रॉनिक फायलिंगची डेडलाइन)

  अशी करा या योजनेत नोंदणी :

  बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही या पॉलिसीसाठी अर्ज करू शकता. बँक मित्रदेखील ही योजना घरोघरी पोहोचवत आहेत. यासाठी विमा एजंटशीही संपर्क साधता येईल. सरकारी विमा कंपन्यांसह अनेक खासगी विमा कंपन्यासुद्धा ही पॉलिसी विकतात. त्यांच्याकडूनही तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता.

  वर्षभरात फक्त 12 रुपये भरून 2 लाखांचे संरक्षण देणारी ही विमा योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असंख्य लोकांसाठी मोठा आधार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशावेळी त्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देते ती विमा योजना. त्यामुळे आपल्या पश्चात कुटुंबासाठी काहीतरी आर्थिक तरतूद करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bank, Business News, Money