आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (5 ऑगस्ट 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : कष्ट केल्यामुळे तुम्हाला आर्थिक रूपात बक्षीस मिळेल. घरखर्च वाढतील. आज तुम्हाला मित्राला पैसे कर्जाऊ द्यावे लागण्याची शक्यता आहे. बिझनेसमधली आर्थिक वाढ समाधानकारक नसेल.
वृषभ (Taurus) : आज महसूल वाढेल. कुठून तरी बोनस मिळेल, याची अपेक्षा करू शकता. लाँग ट्रिपसाठीच्या प्लॅनमुळे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. बिझनेसमन आज खूप व्यग्र असतील. तुम्ही प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मिथुन (Gemini) : तुम्हाला बिझनेसमध्ये आर्थिक नफा मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. गुंतवणुकीबाबत सावध राहा. कोलॅबोरेशन्स, पार्टनरशिप्स चांगलं काम करतील.
कर्क (Cancer) : दैनंदिन बजेट आज थोडंसं कोलमडेल. चांगल्या योजनेत पैसे गुंतवणं खूप फायद्याचं ठरेल. बिझनेसच्या भांडवलासाठीचा तुमचा प्लॅन आज अमलात आणला जाण्याची शक्यता आहे. खासगी उद्योग आज फारसं चांगलं काम करणार नाहीत. दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होईल.
सिंह (Leo) : बिझनेसेस आज नशिबवान ठरतील. एखादा मित्र आज अचानक पैसे मागू शकेल. करिअरमध्ये आर्थिक प्रगतीची अपेक्षा करू शकता. मोठा भाऊ किंवा वडील तुम्हाला आर्थिक मदत करतील. कुटुंबातले खर्च वाढतील.
कन्या (Virgo) : पैशांच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. सरकारी योजनेमुळे तुम्हाला चांगला नफा होईल. दैनंदिन आर्थिक उत्पन्नावर परिणाम होईल. घरखर्च स्थिर राहतील.
तूळ (Libra) : बिझनेसमध्ये गुंतवलेल्या भांडवलातून नफा मिळेल. बिझनेसमध्ये मोठी जोखीम पत्करू नका. पार्टनरशिप बिझनेस आर्थिकदृष्ट्या प्रगती करतील. पूर्वजांची संपत्ती आज नशीब आणि संपत्ती आणेल. सरकारी किंवा सरकारशी संबंधित कामांमध्ये तुमचा तोटा होईल.
वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमधल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. जुन्या कर्जांची परतफेड तुमच्याकडून केली जाईल. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात होणार असलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे तुमचे पैसे खर्च होतील. दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होईल.
धनू (Sagittarius) : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ गुंतवणूक केली जाऊ शकते. कौटुंबिक उत्पन्नात आज वाढ होईल. कामाच्या ठिकाणी आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे; मात्र पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन आर्थिक उत्पन्नावर परिणाम होईल.
मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. बिझसेनमधली पार्टनपशिप फायद्याची ठरेल. सरकारी नोकऱ्यांतून पैसे मिळतील. मित्राला कर्जाऊ दिलेले पैसे आज परत मिळतील.
कुंभ (Aquarius) : गुंतवणूक नफा देणारी ठरेल. आर्थिक समस्यांचं निराकरण होईल. कौटुंबिक खर्च बऱ्यापैकी स्थिर असतील. बँकेत अडकलेले किंवा गमावलेले पैसे परत मिळतील. प्रवास नफा देणारा ठरेल.
मीन (Pisces) : धार्मिक सोहळ्यांमुळे आज मोठा खर्च होईल. मित्राबरोबर केलेल्या प्रवासात तुमचे बरेच पैसे खर्च होतील. बिझनेसमधली आर्थिक परिस्थिती चांगली असेल. दैनंदिन जीवनातल्या आर्थिक समस्या सोडवल्या जातील.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.