Home /News /money /

Money Mantra: प्रचंड आर्थिक समस्या आणि पार्टनरशिप्समध्ये धोका; आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस नाजूक

Money Mantra: प्रचंड आर्थिक समस्या आणि पार्टनरशिप्समध्ये धोका; आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस नाजूक

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (4 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (4 ऑगस्ट 2022) राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत. मेष (Aries) : आज तुम्हाला बिझनेसमध्ये तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा. विनाकारण केलेल्या खर्चांमुळे तुम्ही आर्थिक परिस्थितीबद्दल चिंतित व्हाल. कोणालाही पैसे उधार देणं टाळा. वृषभ (Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. बिझनेसमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही समाधानकारक भांडवल उभारू शकाल. पूर्वजांच्या संपत्तीचा गैरवापर केल्यास तुमचा तोटा होईल. कौटुंबिक खर्च स्थिर राहतील. मिथुन (Gemini) : तुमच्या बिझनेसची आर्थिक वृद्धी होईल. आज पार्टनरशिपमधल्या बिझनेसेसना तोटा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचीही प्रगती होईल. कुटुंबातल्या सदस्यामुळे नफा होईल. तुम्ही बिझनेसमध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत मिळतील. कर्क (Cancer) : एखादी मौल्यवान प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल. कोलॅबोरेशन्स आणि पार्टनरशिप्समधून तोटा होईल. खासगी बिझनेसेस चांगली कामगिरी करतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे तुम्हाला आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. सिंह (Leo) : दैनंदिन उत्पन्नात घसरण होईल. उत्पन्नाच्या स्रोतात अडथळा निर्माण होईल. नोकरीतून तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. घरखर्चात वाढ होईल. बिझनेसमध्ये असलेल्या मित्राचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कन्या (Virgo) : आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. बिझनेसमधलं भांडवल वाढेल आणि तुम्हाला चांगला नफा होईल. तुम्हाला मित्राला पैसे उसने देण्याची गरज भासेल. तुम्ही वाहनखरेदीचा विचार कराल. रिअल इस्टेटशी निगडित कामं नफा देणारी ठरतील. तूळ (Libra) : आर्थिक दृष्टीने आजचा दिवस अत्यंत चांगला असेल. कंपनीमध्ये तुम्हाला आर्थिक साह्य मिळेल. तुम्हाला प्रवासावर खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पूर्वजांच्या संपत्तीतून तुम्हाला नफा मिळेल. वृश्चिक (Scorpio) : तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. तुमचा बिझनेस आज समृद्ध होईल. पार्टनरशिप्स आणि कोलॅबोरेशन्समुळे तोटा होईल. कुटुंबातल्या सदस्य तुम्हाला आर्थिक मदत करील. धनू (Sagittarius) : आज अनपेक्षित परिस्थितीत तुम्ही चांगले पैसे कमवाल. सरकारी योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला घराच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. मकर (Capricorn) : आज तुम्ही जमीन आणि रिअल इस्टेटसाठी पैसे खर्च कराल. आज पैसे अनावश्यक गोष्टींवर खर्च होतील. तुम्ही कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत कराल. आजपासून दैनंदिन आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल. कुंभ (Aquarius) : रिअल इस्टेटमधून फायदा होईल. आजोळकडचं कुटुंब तुम्हाला आर्थिक विषयांत मार्गदर्शन करील. किरकोळ कर्जं तुमच्याकडून फेडली जातील. बिझनेसमधल्या आर्थिक समस्या सोडवल्या जातील. मीन (Pisces) : कुटुंबावरच्या खर्चात वाढ होईल. बऱ्याच काळापासून तुम्हाला त्रासदायक ठरणारं कर्ज तुमच्याकडून लवकरच फेडलं जाईल. बिझनेसमधलं उत्पन्न आज फारसं चांगलं नसेल. विनाकारण खर्च करणं टाळायला हवं.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या