मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Money Mantra: 'या' राशीच्या व्यक्तिंनी कोणाच्याही मोहाला बळी पडू नका; आज मोठा तोटा होण्याची शक्यता

Money Mantra: 'या' राशीच्या व्यक्तिंनी कोणाच्याही मोहाला बळी पडू नका; आज मोठा तोटा होण्याची शक्यता

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (19 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (19 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (19 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (19 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : नशिबाची साथ चांगली राहील. बिझनेसमध्ये करिअरची प्रगती होईल. नफा आणि तुमचा प्रभाव यांत वाढ होईल. उत्तम संतुलन राखाल. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन उत्तम असेल. सहकारी तुमचे पार्टनर बनतील. जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. मोठे प्रयत्न केले जातील. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Red उपाय : 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी कष्ट आणि समर्पण भावनेने काम केल्यामुळे तुम्ही तुमचं स्थान राखाल. सावधगिरी बाळगा. अन्यथा आर्थिक तोट्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये नफा चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. लकी नंबर : 3 लकी कलर : Blue उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा. मिथुन (Gemini) : कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तुमच्या प्रिय व्यक्तींशी चर्चा करा. पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असणं भविष्याच्या दृष्टीने उत्तम ठरेल. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. लकी नंबर : 1 लकी कलर : Green उपाय : श्री दुर्गामातेला लाल ओढणी अर्पण करा. कर्क (Cancer) : खूप प्रयत्न केल्यामुळे उद्योग-व्यवसाय मजबूत व्हायला मदत होईल. प्रिय व्यक्ती आणि वरिष्ठांसोबत मीटिंग होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा घरापुरताच राहील. जमीन-इमारत आदींमधून आर्थिक लाभाची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. लकी नंबर : 9 लकी कलर : Red उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला. सिंह (Leo) : परस्पर नातेसंबंध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण वाढतील. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. दैनंदिन जीवनात शिस्त बाळगा. कुटुंबीयांना पाठिंबा मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. लकी नंबर : 0 लकी कलर : Orange उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. कन्या (Virgo) : शहाणपणाने, बारीकसारीक विचार करून निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही उत्साहाने आणि ऊर्जेने भारावलेले असाल. मोठा विचार करा. लकी नंबर : 8 लकी कलर : Golden उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या. तूळ (Libra) : भौतिक गोष्टींवर जास्त लक्ष असेल. अति हाव असल्यास तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. कोणतंही काम पूर्ण विश्वास ठेवून करा. कौटुंबिक बाबतीमध्ये प्रतिष्ठा जपली जाईल. लकी नंबर : 2 लकी कलर : Purple उपाय : लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा. वृश्चिक (Scorpio) : प्रत्येकाशी सलोखा वाढवणं करिअर आणि बिझनेसमध्ये फायद्याचं ठरेल. संवाद उत्तम असेल. त्यामुळे पैसे मिळवण्याच्या नव्या संधी मिळतील. भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. भावा-बहिणींशी जवळीक वाढेल. लकी नंबर : 6 लकी कलर : White उपाय : काळ्या कुत्र्याला तेलात केलेली इमरती खाऊ घाला. धनू (Sagittarius) : आज तुमचा आत्मविश्वास सर्वोच्च स्थानी असेल. कुटुंबातल्या सदस्यांचा पाठिंबा कायम राहील. सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या कळतील. आयुष्यात भव्यता अनुभवायला मिळेल. प्रॉपर्टीशी संबंधित कामांतून संपत्ती मिळेल. सर्वांशी समानतेची वागणूक ठेवा. लकी नंबर : 9 लकी कलर : Black उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीची सेवा करा. मकर (Capricorn) : सर्व गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून पाहून समजून घेण्याची समज वाढेल. जीवनशैली सुधारेल. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील. करिअरमध्ये उत्तम ऑफर्स मिळतील. आर्थिक कृतींना चालना मिळेल. प्रिय व्यक्तींसोबत काही संस्मरणीय क्षण व्यतीत कराल. लकी नंबर : 8 लकी कलर : Blue उपाय : साखर आणि पिठाचं मिश्रण मुंग्यांना खाऊ घाला. कुंभ (Aquarius) : कोणाच्याही मोहाला बळी पडू नका. तोटा होण्याची शक्यता आहे. धोरणाचे नियम पाळा. नातेवाईकांना आदर दिला जाईल. संस्कृतीला प्रोत्साहन द्याल. पारंपरिक कामात व्यग्र राहाल. प्रिय व्यक्तींकडून सल्ला घ्याल. लकी नंबर : 6 लकी कलर : Pink उपाय : माशांना खाऊ घाला. मीन (Pisces) : आजचा दिवस चांगला आहे. आदरणीय व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल. नफा मिळवण्याचे नवे मार्ग सापडतील. किरकोळ गोष्टींच्या मोहांपासून स्वतःला दूर ठेवा. अन्यथा कसला तरी आळ येऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. लकी नंबर : 4 लकी कलर : Green उपाय : आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या