मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Money Mantra: स्वातंत्र्यदिनी मिळेल मोठी खूशखबर! नवं बिझनेस डील येण्याची शक्यता; आर्थिकदृष्ट्या असा असेल दिवस

Money Mantra: स्वातंत्र्यदिनी मिळेल मोठी खूशखबर! नवं बिझनेस डील येण्याची शक्यता; आर्थिकदृष्ट्या असा असेल दिवस

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (15 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (15 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (15 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (15 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : आज नव्या योजनांमध्ये सहभागी व्हा. त्याचा भविष्यात फायदा होईल. आज तुम्हाला कोणत्याही कायदेशीर वादात यश मिळेल. वैवाहिक नातेसंबंधांत आनंद असेल. लकी नंबर : 8 लकी कलर : Violet उपाय : दुर्गामातेच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा. वृषभ (Taurus) : आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता असू शकेल. तुमच्या आई-वडिलांशी तुमचे तात्त्विक मतभेद होऊ शकतात. प्रेमप्रकरणांसाठी चांगला काळ आहे. नोकरदार व्यक्ती आपल्या कष्टांच्या साह्याने वरिष्ठांचं समाधान करू शकतात. लकी नंबर : 8 लकी कलर : Green उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा. मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्हाला कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं तुमच्यावरचं प्रेम कायम राहील. मुलंही तुमच्यासोबत आनंदी असतील. आज तुम्ही नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार कराल. लकी नंबर : 3 लकी कलर : White उपाय : पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. कर्क (Cancer) : नव्या नोकरीची संधी आणि नवं बिझनेस डील येण्याची शक्यता आहे. समस्यांशी दोन हात करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला नवी ऑफरही मिळू शकेल. शहाणपणाने, विचारपूर्वक काम सुरू करा. तुमचं काम लवकरच पूर्ण होईल. दैनंदिन कामं पूर्ण करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. लकी नंबर : 8 लकी कलर : Blue उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला. सिंह (Leo) : सुरू असलेले प्रोजेक्ट्स आणि कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. गुंतवणूक पुढे ढकलणं चांगलं राहील. प्रॉपर्टीच्या डीलला अंतिम रूप देण्याआधी सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक वाचावीत. अन्यथा हानी होऊ शकते. लकी नंबर : 8 लकी कलर : Grey उपाय : शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तीला साह्य करा. कन्या (Virgo) : आजचा दिवस संमिश्र असेल. कोणतंही मोठं काम सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रातल्या व्यक्तींचं मत नक्की घ्या. आज बिझनेसमध्ये कमी नफा होण्याची शक्यता आहे. होलसेल विक्रीचा बिझनेस असलेल्यांचं काम सुरळीतपणे चालेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Green उपाय : मुंग्यांसाठी साखर आणि पिठाचं मिश्रण ठेवा. तूळ (Libra) : बिझनेसमधल्या काही नव्या प्लॅन्सवर काम सुरू होऊ शकेल. जोडीदाराकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला असेल. आज तुम्ही विचार कराल ते कोणतंही काम पूर्ण होईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी तुमची भेट होऊ शकेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. वृश्चिक (Scorpio) : अ‍ॅकेडमिक क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हाल आणि तुमचं नाव सर्वत्र होईल. आरोग्य चांगलं असेल. तुमच्या आत्मविश्वासाची पातळीही चांगल्यापैकी वाढेल. प्रोफेशनल क्षेत्रात तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठांचं लक्ष वेधून घ्याल. लकी नंबर : 10 लकी कलर : White उपाय : लाल रंगाच्या गायीला गूळ खाऊ घाला. धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. फक्त तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. तोंडून बाहेर पडलेला एखादा चुकीचा शब्दही तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आज तुमच्या घरी कोणी नातेवाईक येण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी चांगलं वर्तन कायम राखलं पाहिजे. लकी नंबर : 10 लकी कलर : Golden उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांचा हार घाला. मकर (Capricorn) : आर्थिक समस्या सोडवल्या जातील. वैवाहिक जीवन आनंददायी असू शकेल. नम्रता आणि तडजोड यांच्या साह्याने तुम्ही गुंतागुंतीची प्रकरणंही सोडवू शकाल. रूटीन कामांमधून पैसे मिळवता येऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमची मानसिकता तयार कराल. तुमच्या मोठ्या समस्याही संपुष्टात येऊ शकतात. लकी नंबर : 3 लकी कलर : Sky Blue उपाय : श्रीराम मंदिरात ध्वज अर्पण करा. कुंभ (Aquarius) : बिझनेस पार्टनर किंवा जवळच्या सहकाऱ्याबद्दल काही अडचण निर्माण होऊ शकेल. बिझनेस ट्रिप्समधून हवे ते परिणाम मिळणार नाहीत. कामाच्या नव्या ठिकाणी जॉइन होण्यासाठी, नवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. लकी नंबर : 1 लकी कलर : Yelow उपाय : श्री हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा. मीन (Pisces) : तुमच्या प्रिय व्यक्तींशी संवाद वाढवू शकता. उपयोगी नसलेल्या गोष्टी करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. तसं केलं, तर आर्थिक तोटा होईल. तसंच तुमच्याकडे चालून येणाऱ्या संधीही तुम्ही गमावून बसू शकाल. आरोग्याविषयी काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. लकी नंबर : 6 लकी कलर : Black उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या