मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Money Mantra: आज तोंडून चुकीचे शब्द निघाले तर डील फसली म्हणून समजा; आर्थिक दृष्टीने सावधगिरी बाळगा

Money Mantra: आज तोंडून चुकीचे शब्द निघाले तर डील फसली म्हणून समजा; आर्थिक दृष्टीने सावधगिरी बाळगा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (10 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (10 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (10 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (10 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस खास असेल. एखाद्या विशेष डीलला अंतिम रूप प्राप्त होईल. प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातला भावनिक बंध मजबूत होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लकी नंबर : 5 लकी कलर : Cream उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला. वृषभ (Taurus) : आज नव्या योजनांबद्दल जाणून घ्याल, त्यात काम सुरू कराल. भविष्यात ते फायद्याचं ठरेल. आज कोणत्याही कायदेशीर वादात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक नातेसंबंध आनंदी असतील. लकी नंबर : 8 लकी कलर : Violet उपाय : दुर्गा देवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा. मिथुन (Gemini) : आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता जाणवेल. तुमच्या आई-वडिलांशी तुमचे काही तात्त्विक मतभेद असू शकतील. प्रेमप्रकरणांसाठी चांगला कालावधी आहे. पगारदार व्यक्ती त्यांच्या कष्टांनी वरिष्ठांचं समाधान करतील. लकी नंबर : 8 लकी कलर : हिरवा उपाय : गरिबांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्हाला कुटुंबीयांचं पूर्ण सहकार्य/पाठिंबा मिळेल. खासकरून कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं तुमच्याबद्दलचं प्रेम कायम राहील. मुलं तुमच्यासोबत आनंदी असतील. नवा बिझनेस सुरू करण्याबाबत तुम्ही आज विचार कराल. लकी नंबर : 3 लकी कलर : White उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला. सिंह (Leo) : नोकरीच्या नव्या संधी आणि नवी बिझनेस डील्स समोर येतील. समस्यांशी दोन हात करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला नवी ऑफरही मिळू शकेल. शहाणपणाने काम सुरू करा. लवकरच तुमचं काम पूर्ण होईल. दैनंदिन कामं पूर्ण करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. लकी नंबर : 8 लकी कलर : Blue उपाय : काळ्या कुत्र्याला गोड काही तरी खाऊ घाला. कन्या (Virgo) : तुमची सुरू असलेली कामं आणि प्रकल्पांमध्ये काही अडथळे येऊ शकतील. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संघर्ष टाळा. गुंतवणूक पुढे ढकलणं चांगलं राहील. प्रॉपर्टी डीलला अंतिम रूप देण्यापूर्वी सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा. अन्यथा काही तरी धोका होऊ शकतो. लकी नंबर : 8 लकी कलर : Grey उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीची सेवा करा. तूळ (Libra) : आजचा दिवस संमिश्र असेल. कोणतंही मोठं काम सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचं मत विचारात घ्या. आज बिझनेसमध्ये नफा कमी मिळण्याची शक्यता आहे. होलसेल विक्रीचा बिझनेस असलेल्या व्यक्तींचं काम सुरळीतपणे सुरू राहील. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Green उपाय : मुंग्यांसाठी पिठात साखर मिसळून ठेवा. वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमधल्या नव्या प्लॅन्सवर काम सुरू होऊ शकेल. पार्टनरकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही एखाद्या कामाचा विचार केलात, तर ते पूर्ण होईल. आज तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटू शकाल. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. धनू (Sagittarius) : शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हाल. तुमचं नाव सर्वदूर पसरेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमचा आत्मविश्वासही बऱ्यापैकी वाढेल. प्रोफेशनल फिल्डमध्ये तुम्ही सुपेरियर्सचं आणि सहकाऱ्यांचं लक्ष वेधून घ्याल. लकी नंबर : 10 लकी कलर : White उपाय : लाल रंगाच्या गायीला गूळ खाऊ घाला. मकर (Capricorn) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. फक्त तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायला हवं. तुमच्या तोंडून एखादा वाईट किंवा चुकीचा शब्द बाहेर पडला, तरी तुम्ही अडचणीत येऊ शकाल. आज तुमच्याकडे कोणी तरी नातेवाईक येतील. त्यांच्याशी तुम्ही चांगलं वर्तन केलं पाहिजे. लकी नंबर : 10 लकी कलर : Golden उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांचा हार घालावा. कुंभ (Aquarius) : आर्थिक समस्या सोडवल्या जातील. वैवाहिक आयुष्य आनंददायी असेल. गुंतागुंतीच्या समस्या तुम्ही तडजोडीने आणि विनम्रपणाने सोडवू शकाल. नेहमीच्या रूटीन कामातून पैसे मिळवता येऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी तुम्ही मानसिकता तयार कराल. तुमच्या मोठ्या समस्या संपू शकतील. लकी नंबर : 3 लकी कलर : Sky Blue उपाय : राम मंदिरात झेंडा अर्पण करावा. मीन (Pisces) : बिझनेस पार्टनर किंवा जवळच्या सहकाऱ्याच्या संदर्भात काही अडचण निर्माण होऊ शकते. बिझनेसशी संबंधित ट्रिप्समधून अपेक्षित रिझल्ट्स मिळणार नाहीत. आजचा दिवस कामाच्या नव्या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी किंवा नवे प्रोजेक्ट्स/व्हेंचर सुरू करण्यासाठी फारसा अनुकूल नाही. लकी नंबर : 1 लकी कलर : Yellow उपाय : श्री हनुमानाच्या देवळात तुपाचा दिवा लावावा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या