नोकरी मिळणं होईल सोपं, सरकार देणार नव्या जमान्याचं ट्रेनिंग

नोकरी मिळणं होईल सोपं, सरकार देणार नव्या जमान्याचं ट्रेनिंग

Skill Development Plan - रोजगार वाढवण्यासाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळण्यासाठी योजना आखलीय.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजना स्किल इंडिया प्रोग्रॅममध्ये अनेक बदल होणार आहेत. ही योजना नव्यानं आकाराला येणार आहे. आता यात मोठ्या कंपन्यांबरोबर असंघटित आणि छोट्या संस्थांना फोकस केलं जाईल. स्किल इंडिया प्रोग्रॅममध्ये काय बदल होणार आहेत, याबद्दल बोलताना कौशल्य विभागाचे सेक्रेटरी डाॅ. केपी कृष्णन म्हणाले की, स्किल इंडिया मिशनमध्ये बदल केले जातील. यात असंघटित क्षेत्रावर फोकस ठेवला जाईल. सरकारचा 4 ते 6 हजार लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योगांवर लक्ष आहे. यात गॅरेज, रेस्टाॅरंटसारख्या इंडस्ट्रीच्या हिशेबानं ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केला जाईल.

कौशल्य वाढवण्यासाठी मिळेल ट्रेनिंग

डाॅ. के पी कृष्णन यांनी सांगितलं, फ्रान्सच्या दसाॅबरोबर एअरोनाॅटिक्समध्ये प्रशिक्षणाचा करार केलाय. सुरुवातीला दसाॅचे टेक्निशियन ट्रेनिंग देतील. कौशल्य विकासासाठी एअरो फिटर, वेल्डर, कटरचं ट्रेनिंग दिलं जाईल.

MIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

दरम्यान, मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच

या आर्थिक अजेंड्यामध्ये खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक, शेती उत्पादन वाढवण्यावर भर आणि रोजगार वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. विरोधकांनी या निवडणुकीत रोजगार कमी झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मुद्द्यावरून जनतेने सरकारला नाकारलेलं नाही हेच लक्षात येतं.

SBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 05:47 PM IST

ताज्या बातम्या