इथे गुंतवणूक केलीत तर 2 वर्षांत दुप्पट होतील तुमचे पैसे

इथे गुंतवणूक केलीत तर 2 वर्षांत दुप्पट होतील तुमचे पैसे

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर रिलायन्सचा शेअर चांगलाच वधारला आहे. या योजनांमध्ये पैसे गुंतवलेत तर तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर रिलायन्सचा शेअर चांगलाच वधारला आहे. या योजनांमध्ये पैसे गुंतवलेत तर तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.

गेल्या एक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातली सगळ्यात मोठी जास्तीत जास्त फायदा देणारी कंपनी झाली आहे. ऑइल- केमिकल या क्षेत्रांबरोबरच जिओ आणि रिटेलमध्येही रिलायन्स आघाडीवर आहे.

सोमवारी झालेल्या घोषणांनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांहूनही जास्त वाढ झाली. स्टॉकमध्ये 1400 रुपयांची वाढ होईल आणि 2019 मध्ये यामध्ये चांगलीच वाढ दिसेल, असं Sptulsian.com चे एस. पी. तुलसी यांनी म्हटलं आहे. रिलायन्सच्या या घोषणांमुळे शेअर बाजारात तेजी येईल, असंही ते म्हणाले.

'काश्मीरच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना अतिरेक्यांबद्दल तळमळ'- मोदी

देशातला सगळ्यात मोठा FDI करार

रिलायन्स आणि Saudi Aramco या कंपनीच्या करारावरही सगळ्यांचं लक्ष आहे. हे करार आणि देवाणघेवाण याच आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची अपेक्षा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली आहे.Saudi Aramco कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑईल-केमिकल व्यवसायात दीर्घकाळाच्या भागीदारीला मंजुरी दिली आहे. सौदी अरेबियाची ही कंपनी रिलायन्सच्या ऑइल - केमिकल व्यवसायात 20 टक्के भागीदारी करणार आहे. ही रिलायन्समधली सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक असेल. या व्यवहारामुळे Saudi Aramco रिलायन्सच्या रिफायनरीसाठी प्रतिदिन 5 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करेल.

प्रभुदास लीलाधर चे सीईओ अजय बोडके म्हणाले, रिलायन्स आणि Saudi Aramco यांच्यामधल्या या कराराचं शेअर बाजारात चांगलं स्वागत होईल. ही भारतातली सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक असल्याने अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारात आलेली मंदी दूर होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

=========================================================================================

VIDEO: पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागितली मदत, 6 हजार कोटींची मागणी!

Published by: Arti Kulkarni
First published: August 14, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading