मराठी बातम्या /बातम्या /मनी /

‘मैं धारक को... रुपये अदा करने का वचन देता हूँ’ नोटांवरील या ओळीचा अर्थ माहिती आहे का?

‘मैं धारक को... रुपये अदा करने का वचन देता हूँ’ नोटांवरील या ओळीचा अर्थ माहिती आहे का?

Indian Note : 'मैं धारक को...रुपये अदा करने का वचन देता हूँ',  असं वाक्य कोणत्याही नोटेवर लिहिलेलं असतं. या ओळीचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का?

Indian Note : 'मैं धारक को...रुपये अदा करने का वचन देता हूँ', असं वाक्य कोणत्याही नोटेवर लिहिलेलं असतं. या ओळीचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का?

Indian Note : 'मैं धारक को...रुपये अदा करने का वचन देता हूँ', असं वाक्य कोणत्याही नोटेवर लिहिलेलं असतं. या ओळीचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का?

मुंबई, 18 ऑगस्ट :  आपण कोणतंही काम, नोकरी (Job), व्यवसाय हे सर्व आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. कारण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू लागतात, त्यासाठी आपल्याला पैसे (Money) मोजावे लागतात. बाजारात काही खरेदी करायला गेलो तर तिथल्या वस्तूच्या बदल्यात काही रुपये मोजावे लागतात. पूर्वीच्या काळात वस्तूंच्या बदल्यात वस्तू खरेदी केल्या जायच्या. पण नंतर त्याची जागा चलनाने घेतली. आपल्या देशात एक रुपयांपासून ते 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत. या नोटा देऊन आपण वस्तूंची खरेदी करतो आणि आर्थिक व्यवहार करतो. तुम्ही या नोटांवर (Currency Notes) लिहिलेलं एक वाक्य वाचलं असेल. प्रत्येक नोटवर खाली 'मैं धारक को...रुपये अदा करने का वचन देता हूँ', असं वाक्य लिहिलेलं असतं. हे वाक्य 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांवर लिहिलेलं असतं. पण याचा अर्थ काय? किंवा नोटेवर असं का लिहिलेलं असतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज या वाक्यामागचं कारण आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने वृत्त दिलंय. काय आहे अर्थ? भारतातील सर्व नोटा छापण्याची आणि वितरित करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) आहे. धारकाला विश्वास देण्यासाठी रिझर्व्ह बँक हे वचन नोटवर लिहिते. याचा अर्थ तुमच्याकडे असलेल्या नोटेचं मूल्य जितकं आहे, त्याच मूल्याचं सोनं (Gold) आरबीआयकडे राखीव आहे. म्हणजेच 100 किंवा 200 रुपयांच्या नोटेसाठी धारकावर 100 किंवा 200 रुपयांचं दायित्व असल्याची हमी आहे. ATM मधून पैसे काढणे झाले महाग, वाचा तुमची बँक किती आकारणार चार्ज एक महत्त्वाची गोष्ट म्हणेज भारतात 1 रुपयापासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. या सर्व नोटांच्या मूल्यासाठी आरबीआय गव्हर्नर जबाबदार आहेत. एक रुपयाची नोट वगळता इतर सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची सही असते. तर, एक रुपयाच्या नोटेवर भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. तुम्ही हातात नोट घेऊन कधी नीट निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या बाजूला तिरकस रेषा असतात. याला 'ब्लीड मार्क्स' (Bleed Marks) म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खास दृष्टिहीनांसाठी केलेले असतात. नोटेवरील या मार्क्सना स्पर्श करून ते ही किती रुपयांची नोट आहे हे सांगू शकतात. त्यामुळेच 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या रेषा छापण्यात येतात. सर्व नोटांवरील रेषा या सारख्या नसतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नोटेवर माहिती का आणि कशासाठी लिहिलेली असते.
First published:

Tags: Money, Rbi

पुढील बातम्या