बँकेतील अर्थिक व्यवहारांसाठी आता आकारलं जाणार अतिरिक्त शुल्क

बँकेतील अर्थिक व्यवहारांसाठी आता आकारलं जाणार अतिरिक्त शुल्क

15 डिसेंबरपासून बचत खात्यावरील व्यवहार आणि एटीएमसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: तुमचं बँकेत बचत खात असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ICICI बँकेच्या बदलेल्या नियमानुसार आजपासून बचत खातं आणि एटीएम सेवेसाठी बँकेकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. तुमचं जर ICICI बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपासून आयसीआयसीआय बँक बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. तुम्हाला जर हे बदलेले नियम माहीत नसतील तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे बदलेल्या नियमांची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो.

वाचा-रोज 400 रुपये वाचवा आणि व्हा मालामाल, हे आहे सिक्रेट

कॅश ट्रान्झाक्शनसाठी किती असेल चार्ज

बचत खात्यातून ग्राहक महिन्यातून 4 वेळा पैसे खात्यात भरू शकतो अथवा काढू शकतो. त्यानंतर पाचव्या व्यवहारापासून ट्रान्झाक्शनवर तुम्हाला 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

ग्राहक होम ब्रांचमधून 2 लाख रुपयांपर्यंत आपल्या खात्यातून काढू शकतो किंवा भरू शकतात. मात्र 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास प्रत्येकी 1000 रुपयांमागे 5 रुपये असे मिनिमम शुल्क आकारण्यात येणार आहे.

होम ब्रांच नसल्यास तुमच्या खात्यातून तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत ट्रान्झाक्शन करू शकता. 25 हजार रुपयांपर्यंत केलेले कोणतेही व्यवहार हे विनाशुल्क असतील मात्र त्यानंतर हजार रुपयांमागे 5 रुपये आणि मिनिमम शुल्क 150 असे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

वाचा-खूशखबर! पुढच्या वर्षी भारतीयांना मिळणार सगळ्यात जास्त पगार

थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शन- थर्ट पार्टी कॅश ट्रान्झाक्शनसाठी प्रतिदिवशी तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत बँकेतून देवाण-घेवाण करत येणार आहे. मात्र त्यावर 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शनसाठी 25 हजारांपेक्षा अधिक व्यवहाराला बँकेकडून परवानगी देण्यात येणार नाही.

ATM व्यवहारांसाठीही बदलणार शुल्क

ICICI बँकेने बँकेतील बचत खात्यातील व्यवहारांसोबतच एटीएममधील व्यवहारांवरही निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. ICICI बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात 5 ट्रान्झाक्शन विनाशुल्क असतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला 20 रुपये आकारण्यात येणार आहेत. चेकबुक, पासबुक, स्टेटमेंट यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार आहे.

----------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 01:01 PM IST

ताज्या बातम्या