मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Money Mantra: प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय घेताना सावधान; या राशींना आज होऊ शकतं आर्थिक नुकसान

Money Mantra: प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय घेताना सावधान; या राशींना आज होऊ शकतं आर्थिक नुकसान

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (14 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (14 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (14 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (14 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : पैसे मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. तुम्हाला आदर मिळेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. लकी नंबर : 1 लकी कलर : Pink उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा. वृषभ (Taurus) : कुटुंबाशी संबंधित काम पूर्ण होईल. संवादात इगोचं प्रदर्शन करणं टाळा. धार्मिक कामांमध्ये रस वाढेल. प्रवासाचे योग येण्याची शक्यता. त्यामुळे आर्थिक लाभांची शक्यता आहे. लकी नंबर : 1 लकी कलर : Ocher उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा. मिथुन (Gemini) : रखडलेलं काम पूर्ण होईल. पैसे मिळवण्यासाठी कष्ट वाढवण्याची गरज आहे. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. लांबचा प्रवास टाळा. कौटुंबिक जीवनात संघर्ष टाळा. लकी नंबर : 5 लकी कलर : Orange उपाय : श्री हनुमानाची आरती करा. कर्क (Cancer) : अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. दूरवरून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. नातेवाईकांसोबत मतभेद होऊ शकतील. आरोग्यासंदर्भात काळजीचं काही तरी कारण असू शकेल. लव्ह लाइफमध्ये नवा आनंद मिळू शकेल. लकी नंबर : 9 लकी कलर : Red उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. सिंह (Leo) : बऱ्याच काळापासून तुम्हाला सतावत असलेली मानसिक चिंता दूर होईल. पूर्ण उत्साहाने काम करा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय शहाणपणाने, विचारपूर्वक घ्या. तरच नफा होणं शक्य आहे, अन्यथा तोट्याची शक्यता. तुम्हाला कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Badami उपाय : गायीला चपाती खाऊ घाला. कन्या (Virgo) : सोयी-सुविधांसाठीचा खर्च वाढेल. त्यामुळे काही जणांना कदाचित कर्जही घ्यावं लागू शकतं. तुम्ही अनोळखी व्यक्तींना भेटाल. अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही लाभ होईल. लव्ह रिलेशनशिप्सकडे खास लक्ष द्यावं लागेल. लकी नंबर : 4 लकी कलर : White उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा. तूळ (Libra) : आर्थिक लाभासाठी क्षमता उत्तम आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आदरात आणखी वाढ होईल. तुमच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. वर्तनात क्रोधाचं दर्शन घडवल्यास तोटा होण्याची शक्यता. कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत केल्यास मनःशांती मिळेल. लकी नंबर : 10 लकी कलर : Light Red उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळं दान करा. वृश्चिक (Scorpio) : करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी उपलब्ध होतील. तुमची कौशल्यं अधिक वृद्धिंगत करण्याचा हा काळ आहे. धार्मिक कार्यात रस घ्याल. आरोग्य उत्तम असेल. प्रियकर/प्रेयसीबद्दल मनात काही संशय निर्माण होऊ शकेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Orange उपाय : सुंदरकांडाचं पठण करा. धनू (Sagittarius) : नशीब साथ देईल. पैसे मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. स्थलांतर फायद्याचं ठरेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध दृढ होतील. लकी नंबर : 7 लकी कलर : Saffron उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळं दान करा. मकर (Capricorn) : शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम फायद्याचं ठरेल. कोणासोबतही मतभेद होऊ शकतात. तुमचं बोलणं मृदू ठेवा. घाईघाईत निर्णय घेणं टाळा. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खास प्रयत्न करावे लागतील. लकी नंबर : 1 लकी कलर : Sindoori उपाय : श्री हनुमानाची आरती करा. कुंभ (Aquarius) : पूर्ण उत्साहाने काम करा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. लांबचा प्रवास करणं टाळा. महत्त्वाचा निर्णय घ्यायला उशीर करू नका. उशीर केल्यास तुम्ही नफ्याची संधी गमावू शकाल. लकी नंबर : 10 लकी कलर : Maroon उपाय : सुंदरकांडाचं पठण करा. मीन (Pisces) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस खास असेल. एखादं महत्त्वाचं डील होईल. त्यातून आर्थिक फायदा होईल. प्रियकर-प्रेयसीमधला भावनिक बंध दृढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लकी नंबर : 5 लकी कलर : Cream उपाय : गायीला हिरवं गवत किंवा पालक खाऊ घाला.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या