MC Insider : भारतीय उद्योग जगातल्या बित्तंबातम्या; कॉर्पोरेटचा पॉवर प्ले

सिनेमा जगतातल्या आतल्या बातम्या सांगणाऱ्या खूप वेबसाइट्स आहेत. पण उद्योग जगतातली आतली पक्की खबर सांगण्यासाठी मनी कंट्रोलने MC Insider सदर सुरू केलं आहे. त्याचाच हा आजचा भाग..

सिनेमा जगतातल्या आतल्या बातम्या सांगणाऱ्या खूप वेबसाइट्स आहेत. पण उद्योग जगतातली आतली पक्की खबर सांगण्यासाठी मनी कंट्रोलने MC Insider सदर सुरू केलं आहे. त्याचाच हा आजचा भाग..

  • Share this:
    मनी कंट्रोलने सांगितलेल्या उद्योग जगतातल्या बातम्या : WFHची जोखीम आली अंगाशी वर्क फ्रॉम होम WFHमुळे  भारतीय उद्योग जगताला विशेषत: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नेहमी ऑफिसमध्ये असतानाही सीनिअर्सना आपल्या ज्युनियर्सच्या कामावर लक्ष ठेवणं जमत नाहीच आता WFH मुळे तर त्यांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत! या अग्रगण्य टेक फर्मचा विचार करा ज्यांना त्यांच्या एका मोठ्या प्रकल्पासाठी त्वरित डॅमेज कंट्रोल करावं लागलंय. का? क्लाएंटचा संवेदनशील डाटा ‘जवळपास’ लिक झाला आहे. इथं घडलं असं : एका नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याने सर्वांना अक्सेस असलेल्या इंटरनल टूलच्या माध्यमातून क्लायंटचा सोर्स कोड (ज्यामध्ये संवेदनशील माहिती होती) कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मॅनेजर्सना लगेच अलर्ट गेला. या यंत्रणेचे चेक्स व्यवस्थित चालत होते हे बरं झालं. या अतिसाहसी नव्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं. तो नवा कर्मचारी प्रशिक्षितही असेल पण ऑफिसच्या सेटिंगमध्ये असा स्लिप अप टाळता आला असता का?  असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आणि हे खरंच WFHमुळे निर्माण झालेलं संकट आहे का? खेळामधील 'दादागिरी' गेल्या वर्षी देशात झपाट्याने वाढणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या यादीत सहभागी होणारी  ही कंपनी भारतातील पहिली गेमिंग कंपनी ठरली. 2020 च्या वर्षात आणखी एक चांगली बातमी आली. या कंपनीने देशातील सर्वात मोठ्या वार्षिक स्पोर्टिंग एक्सट्रावेगॅन्झाचं प्रायोजकत्व मिळविले. परंतु एवढी मोठी गुंतवणूक केलेल्या या कंपनीला आपण निर्णयाचा फेरविचार करायला हवा होता असं वाटतंय. कारण? प्रतिस्पर्धी गेमिंग कंपनीने एका वरिष्ठ स्पोर्ट्स अडमिनिस्ट्रेटरला घेऊन जाहिरात केली असून त्यांना या जाहिरातीचा जबरदस्त फायदा होत आहे. यात कोणताही कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उद्भवणार नाही असं त्या अडमिनिस्ट्रेटरने म्हटलं आहे. पण जेव्हा चिनी कंपनीकडून या स्पर्धेचं प्रायोजकत्व काढून घेण्यात आलं तेव्हा ही स्पर्धा अडचणीत असताना ती वाचवण्यासाठी या कंपनीने हजारो कोटी रुपये खर्चून त्याचं प्रायोजकत्व मिळवलं पण त्याऐवजी या अडमिनिस्ट्रेटरला घेऊन जाहिरात केली असती तर बरं झालं असतं असं कंपनीला आता वाटत असावं. व्यवसायातील गेममध्ये ही कंपनी कमी पडली. KBC 12 ला कोणी अडचणीत आणलं? महामारी असो किंवा महामारी नसो, क्रिकेट हा भारतातील एक धर्म आहे आणि यावर्षी पुन्हा आयपीएलने हे सिद्ध केलं आहे. या वार्षिक क्रिकेटिंग एक्सट्रावेगॅन्झाने क्विझ शो कौन बनेगा करोडपती किंवा केबीसीची व्ह्युवरशीप पूर्णपणे खाऊन टाकली असून त्यामुळे या शोच्या कमाईत मोठी घट झाली आहे, असे एका उद्योगातील आतील सूत्रांनी सांगितलं. शोचा हा 12 वा सिझन आहे आणि असं म्हटलं जातंय की व्ह्युवरशीप कमी झाल्यामुळे स्पॉट अडसाठी आणि प्रायोजकत्वासाठी प्रीमियम दरही शोला मिळू शकला नाही. या वर्षी केबीसी को पॉवर्ड स्पॉन्सरशीपसाठी सुमारे 35-40 कोटी रुपये आणि असोसिएट स्पॉन्सरसाठी 25 कोटी रुपये घेऊन काम करीत आहे. अड इन्व्हेंटरीसाठी 3.5-4 लाख रुपये दर आहे. हे सर्व दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. तरीही शोच्या निर्मात्यांनी या सर्व गोष्टी बाजूला सारून कार्यक्रम "पूर्वीप्रमाणेच चांगला सुरू आहे" या म्हणण्यावर जोर दिला आहे. मोहक शांतता जरा कडवट वळणावर येऊन संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या या  कॉर्पोरेट लढाईच्या गीअर्समध्ये सध्या काहीसा बदल होताना दिसत आहे.  यापैकी एख पक्ष आपला POV  पुढे ठेवण्यासाठी माध्यमांमध्ये आक्रमक अभियानं राबवत आहे त्यामुळे नजीकच्या भविष्यात या दोन्ही कॉर्पोरेट्समध्ये शांतपणे तडजोड होणं दुरापास्तच दिसतंय. हं, आता एखाद्याने सर्व कटुता मिटवून शांततेसाठी उत्सुकता दाखवली तर ठीक आहे, पण ते अशक्य दिसतंय. आणि एका पक्षाने अलीकडेच सादर केलेला ‘साधा तोडगा’ खरोखरच सावधगिरीने पुढे जाण्यास उत्सुक असलेली दुसरी बाजू मान्य करण्याची शक्यता कमी आहे. स्पष्टपणे, हा कलह अपेक्षेपेक्षा जास्त काळ वाढू शकेल, जोपर्यंत न्यायालय हस्तक्षेप करून त्याची डेडलाइन ठरवत नाही तोपर्यंत तो चालू राहील असं वाटतंय. आरोग्यदायी कल्पना आयटी उद्योगातील काही विशिष्ट लोकांसह आपल्या नावाचं साधर्म्य असणारा एक अग्रगण्य हेल्थकेअर गुप अचानकच एक आरोग्य योजना बाजारात आणू इच्छितो. महागाईमुळे अडचणीत सापडलेल्या कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मदत करण्यासाठी स्वत: ची आरोग्य सेवा सुरू करण्याचा विचार हा ग्रुप करत आहे. देशात कोणतीही सामाजिक सुरक्षा योजना किंवा सार्वत्रिक आरोग्य विमा नसताना असा विचार करणं खरोखरच प्रशंसनीय आहे. ही योजना लो सबस्क्रिपश्न मॉडेल असेल जे लवकर निदान आणि उपचारांना प्रोत्साहित करेल. आम्ही खात्रीपूर्वक आशा करतो की या फर्मच्या कल्पनेती त्या क्षेत्रातील इतर कंपन्याही काही शिकतील. रेकॉर्डवर असलेलं/नसलेलं केंद्रीय मंत्रालयं व विभागांकडील बातमी प्रसिद्ध करण्याची कार्यप्रणाली व्यवस्थित कार्यरत  आहे. बहुतेक मंत्रालयांचे प्रवक्ते भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) आहेत. बहुधा मंत्र्यांचे मीडिया सल्लागार असतात. परंतु रायसीना हिलवरील महत्त्वाच्या मंत्रालयाच्या एक शक्तिशाली आणि प्रभावी नोकरशहाने स्वत: साठी मीडिया सल्लागार नेमून आपलं वेगळेपण दाखवायचा प्रयत्न केला आहे. हा गृहस्थ बहुधा अशी लक्झरी असलेला केंद्र सरकारमधील एकमेव सचिव असेल. आयआयएस केडरमध्ये अनेक दु:खी चेहरे आहेत यात आश्चर्य नाही. बरेचदा माध्यम सल्लागाराने अधिकृत प्रवक्त्यास न विचारताच थेट पत्रकारांना प्रेस रिलिझ पाठवल्या आहेत. ही 'प्रेस स्टेटमेन्ट्स' अत्यंत विलक्षण आहेत कारण ती 'ऑफ द रेकॉर्ड' म्हणजे जाहीर न करण्याजोगी आहेत. यातला मजकूर असा आहे की जो कधीच प्रसिद्ध केला जाऊ शकत नाही. ही जगावेगळी प्रेस स्टेटमेंट्स 'सरकारमधील सर्वोच्च सूत्रांनी सांगितलं ...' किंवा ' सरकारीमधील अनेक सूत्रांनी सांगितलं...' अश वाक्यांपासून सुरू होतात आणि त्यानंतर संबंधित मंत्रालयाच्या कामगिरीविषयी स्पष्टपणे माहिती देतात. पत्रकारांच्या अधिकृत प्रवक्त्यांकडे तक्रारी जाऊनही, या सचिवाच्या बॉसना त्यांची कार्यपद्धती मान्य असल्यामुळे यावर काही कारवाईच होत नाही. लो-प्रोफाइल CEO या मोठ्या बँकेची इन-हाऊस कम्युनिकेशन्स टीम आणि पीआर टीम आता वैतागल्या आहेत. कंपनीच्या महत्त्वाच्या इव्हेंटसाठी तरी माध्यमांपुढे या हे समजवून सांगून त्यांच्या माध्यम टीम्स थकल्या आहेत. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सीईओनी प्रेसशी बोलणं महत्त्वपूर्ण आहे असा त्यांचा तर्क ऐकण्याच्या मनःस्थितीतच हे सीईओ महाशय नाहीत. मुलाखती विसराच, पण त्यांनी तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेतही चार शब्द बोललेले नाहीत. खरं सांगायचं तर, बँक चांगली प्रगती करत आहे आणि अप्रिय भूतकाळातील आठवणी मोठ्या प्रमाणात विसरल्या गेल्या आहेत. सीईओ ठामपणे सांगतात की त्यांना बँकेचा चेहरा म्हणून माध्यमांसमोर येण्याची गरज नाही. या दृष्टिकोनाने त्यांच्या बर्‍याच सहकाऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे, कारण अगोदर जे सीईओ होते ते मीडिया सॅव्ही होते आणि नियमितपणे सर्व माध्यमांना दीर्घ मुलाखती द्यायचे. त्यांचे उत्तराधिकारी दुसरं टोक गाठत आहेत. कदाचित सर्वांत आघाडीच्या बँकांपैकी हे एकमेव सीईओ असतील जे मागे राहून बँकेचं नेतृत्व करत आहेत. कॉन्फिडेन्शियल डील नाही फॉरेन ब्रोकरेजच्या मुद्द्यामुळे भारतातील सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये शेअर बाजारात जोरदार स्पर्धा लागली असून बरेचसे शेअर वर जात आहेत. या सर्व आशांदरम्यान, आम्हाला असं कळतंय की मिड-कॅप सिमेंट प्लेयर या लाटेवर आरूढ होऊन शेअर पैशांत रुपांतरित करू इच्छितो आहे. अनेक HNI हे शेअर विकत घेण्याची तयारी चालवली आहे. सिमेंट क्षेत्रातील शेवटचा महत्त्वाचा करार म्हणजे जेव्हा निरमा समूहाने इमामी समूहाच्या मालमत्तेच्या खरेदीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी इतर बड्या प्रतिस्पर्धींना स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. या सिमेंट कंपनीला तिच्या स्पर्धकांप्रमाणेच कोविड-19 महामारीचा आर्थिक फटका बसला आहे. पण त्यांची मोठी बचत गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. तुंबलेलं शॉपिंग कार्ट Covid - 19 आणि लॉकडाऊनने ग्राहक इंटरनेट स्पेसला बूस्टर डोस दिला आहे. जसजशी मागणी वाढत जाते तशीच ग्रोथ कॅपिटलचीदेखील आवश्यकता असते.  ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या क्षेत्रातील एक कंपनी मोठी डील करण्याच्या तयारीत आहे. आता या कंपनीचा ऑनलाइन बिझनेस बहरला असल्याने ही बडी कंपनी व्यवसाय वृद्धीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पण एवढंच नाही. सध्यातरी ग्राहकांचं वर्तन थोड्या काळासाठी बदललं नाही तर जागतिक स्तरावरील मोठा गुंतवणूकदारही या कंपनीत गुंतवणूक करेल आणि त्या गुंतवणुकीला ‘बास्केट’ म्हणता येईल.
    First published: