आता ATM मधून मोबाईल वॉलेटद्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या कशी असणार प्रक्रिया

आता ATM मधून मोबाईल वॉलेटद्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या कशी असणार प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण (Monetary Policy) जाहीर केलं, त्यात मोबाईल वॉलेटसारख्या (Mobile Wallet) प्रीपेड इन्स्ट्रुमेंटच्या (Prepaid Instrument) माध्यमातून रोख रक्कम (Cash Withdrawal) काढण्याची तसंच मर्चंट पेमेंटची परवानगी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Transactions) जगभरात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात (India) डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) या क्षेत्रातील नवीन पद्धतींना मान्यता देत आहे. यामुळे ग्राहकांना अगदी सहजपणे आर्थिक व्यवहार करणं शक्य होऊ लागलं आहे. अलिकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण (Monetary Policy) जाहीर केलं, त्यात मोबाईल वॉलेटसारख्या (Mobile Wallet) प्रीपेड इन्स्ट्रुमेंटच्या (Prepaid Instrument) माध्यमातून रोख रक्कम (Cash Withdrawal) काढण्याची तसंच मर्चंट पेमेंटची परवानगी दिली आहे. तसंच डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) व्यवहारांचीही परवानगी दिली आहे. यामुळे आता मोबाईल वॉलेट सेवा देणाऱ्या कंपन्याही बँकेसारख्या काही सेवा देऊ शकणार आहेत. मोबाईल वॉलेट सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे स्वतःची एटीएम नाहीत, तर ग्राहक एटीएममधून पैसे कसे काढू शकणार असा प्रश्न उभा रहात आहे.

असे काढता येणार एटीएममधून पैसे -

याबाबत पेवर्ल्ड मनी (Payworld Money) या डिजिटल पेमेंट कंपनीचे संचालक आणि मुख्य अधिकारी प्रवीण धाभाई यांनी सांगितलं की, आता मोबाईल वॉलेट कंपन्याही आपल्या ग्राहकांना प्रीपेड कार्ड देतील. या कार्डचा उपयोग करून ते कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतील. तसंच दुकानांमध्ये कार्ड स्वाईप करून पेमेंटही करू शकतील.

(वाचा - तुमच्या मुलांचा 5 वा बर्थडे सेलिब्रेट केलात; आता त्यांचं Aadhaar Card अपडेट करा)

ऑक्टोबर 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने इंटरऑपरेबिलीटीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये वॉलेट्सना यूपीआयच्या (UPI) माध्यमातून पैसे हस्तांतरीत करण्यासह रूपे (Rupay) आणि व्हिसा (Visa) नेटवर्कच्या साहाय्याने प्रीपेड कार्ड देण्यास परवानगी दिली होती. आतापर्यंत ही सुविधा देणं ऐच्छिक होतं आणि काही कंपन्यांनीच तयारी दाखवली होती. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं सर्वच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच डिजिटल कंपन्यांना इंटरऑपरेबिलीटी सेवा अनिवार्य केली आहे.

(वाचा - सावधान! Buy now, pay later योजनेला भुलू नका; मोठ्या अडचणीत सापडाल)

तीन टप्प्यात मिळणार सुविधा -

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार, तीन टप्प्यांमध्ये इंटरऑपरेबिलीटी कार्यान्वित होणार आहे. यामध्ये आधी वॉलेट्स यूपीआयमध्ये सहभागी होतील. दुसऱ्या टप्प्यात वॉलेट्सना यूपीआयच्या माध्यमातून पैसे बँक खात्यात हस्तांतरीत करण्याची परवानगी मिळेल. तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट कंपन्यांना कार्ड जारी करण्याची परवानगी दिली जाईल. काही कंपन्या प्रायोगिक तत्वावर कार्ड जारी करत आहेत. सध्या बँका आधार (Aadhar) आधारीत पेमेंट सुविधा देतात तशी सेवा वॉलेट कंपन्या देऊ शकत नाहीत. बहुतांश ग्राहक वॉलेटला आधारशी (Wallet Aadhar Link) जोडत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड आधारीत सेवा देणं या डिजिटल कंपन्यांना शक्य नाही.

First published: April 10, 2021, 1:37 PM IST
Tags: ATM

ताज्या बातम्या