पेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन दिवसांनी मिळाला दिलासा, 'हे' आहेत नवे दर

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन दिवसांनी मिळाला दिलासा, 'हे' आहेत नवे दर

Petrol, diesel - तीन दिवस पेट्रोलच्या किमती वाढत होत्या पण आज ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : शनिवारनंतर ( 13 जुलै ) पेट्रोलच्या किमती वाढत होत्या. पण तीन दिवसांनंतर आज ( 16 जुलै ) पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल झालेला नाही. HPCL, BPCL, IOC रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

सोमवारी ( 15 जुलै ) पेट्रोलच्या किमती दिल्ली आणि मुंबईत 13 पैसे प्रति लीटर, कोलकत्तामध्ये 17 पैसे प्रति लीटर तर चेन्नईत 14 पैसे प्रति लीटर महाग झालं होतं. डिझेलचा दर कालही स्थिर होता.

MIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती

इंडियन ऑइलच्या वेबसाइटप्रमाणे दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलचे दर क्रमश:  73.21 रुपये, 75.55 रुपये, 78.82 रुपये आणि 76.03 रुपये प्रति लीटर आहे. या चारही महानगरात डिझेलचे दर क्रमश: 66.24 रुपये, 68.31 रुपये, 69.43 रुपये आणि 69.96 रुपए प्रति लीटर आहे.

आपण पेट्रोल खरेदी करतो तेव्हा 48 टक्के बेस प्राइस, 35 टक्के एक्साइज ड्युटी, 15 टक्के सेल्स टॅक्स आणि 2 टक्के कस्टम ड्युटी लावली जाते.

SBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा

बजेटच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्या होत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती!

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं होतं. मुंबईतही इंधानाचे दर वाढले होते. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर एक रुपया सेझ लावल्यानंतर पेट्रोल - डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 78.47 रुपये झालं होतं तर हेच पेट्रोलचे दर 5 जुलै रोजी 76.18 रुपये इतके होते.

कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच

5 जुलैला पुण्यात पेट्रोलचे दर लीटर मागे 78.47 रुपये तर डिझेलचा दर 68.72 रुपये इतका होता. बजेमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये सेस लावण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम आता इंधानाच्या किंमतीवर दिसणार आहे. शुक्रवारी सेस लावण्यात आला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 2:30 रुपये प्रति लीटरने वाढ झाली होती.

युवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading