मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पैशांची चणचण असेल तरी नो टेन्शन! घरातील सोन्यावर मिळेल सर्वात स्वस्त Gold Loan

पैशांची चणचण असेल तरी नो टेन्शन! घरातील सोन्यावर मिळेल सर्वात स्वस्त Gold Loan

कर्जफेडीत असलेली लवचिकता (Flexibility) हा या प्रकारच्या कर्जाचा मोठा फायदा आहे.

कर्जफेडीत असलेली लवचिकता (Flexibility) हा या प्रकारच्या कर्जाचा मोठा फायदा आहे.

कर्जफेडीत असलेली लवचिकता (Flexibility) हा या प्रकारच्या कर्जाचा मोठा फायदा आहे.

मुंबई, 6 जुलै- कोरोना काळात (Corona Pandemic) लागू केलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. पुरवठा कमी झाला, महागाई वाढली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे कर्जात बुडाले. अनेकांना घरखर्च भागवणंही अवघड होत चाललं आहे. कितीही अडचणी असल्या, तरी कोणालाही पैशांसाठी दुसऱ्याकडे हात पसरायला आवडत नाही. शिवाय या काळात तर सगळ्यांवरच आर्थिक संकट कोसळलं असल्यामुळे कोणाकडून पटकन मदत मिळेलच याची खात्रीही देता येत नाही; पण घरात सोन्याचे काही दागिने किंवा सोनं असेल, तर 'गोल्ड लोन' (Gold Loan) हा अशा परिस्थितीत सोन्यासारखा पर्याय आहे.

गोल्ड लोन हा तातडीने मिळणारा कर्जाचा प्रकार आहे. या प्रकारचं कर्ज कर्जदात्यांकडून साधारणतः त्याच दिवशी दिलं जातं. या कर्जांच्या परतफेडीचा कालावधी साधारणतः तीन वर्षांचा असतो. काही कर्जदाते चार ते पाच वर्षांची मुदतही देतात. तारण ठेवलेल्या सोन्याचं मूल्य आणि मंजूर असलेला एलटीव्ही रेशो (LTV Ratio) यांवर कर्जाची रक्कम अवलंबून असते.

कर्जफेडीत असलेली लवचिकता (Flexibility) हा या प्रकारच्या कर्जाचा मोठा फायदा आहे. ईएमआय (EMI) पद्धतीने ही कर्जफेड (Repayment) करता येतेच; शिवाय काही कर्जदाते ग्राहकांना केवळ व्याजाची रक्कम लगेच देण्यास सांगतात आणि मुद्दल (Principal Amount) कर्जसमाप्तीच्या वेळेस फेडण्यास सांगतात. ज्यांच्याकडे नियमित उत्पन्नाचं साधन नसल्याने ईएमआय हा पर्याय सोयीस्कर नसतो, अशा व्यक्तींना गोल्ड लोन हा चांगला पर्याय आहे.

(हे वाचा: दिवाळीपर्यंत सोनं पोहोचणार 52 हजारांवर,आता 9000 रुपयांनी स्वस्त असताना करा खरेदी)

स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या (State Bank of India) देशातल्या सर्वांत मोठ्या सरकारी बँकेपासून मुथुटसारख्या (Muthoot) गोल्ड फायनान्सिंग (Gold Finance) कंपनीपर्यंत वेगवेगळ्या संस्थांमधून गोल्ड लोन मिळू शकतं. या कर्जासाठी फार कष्ट पडत नाहीत. तुमच्याकडे असलेलं सोनं घेऊन बँक किंवा गोल्ड फायनान्सिंग कंपनीकडे जावं लागतं. तिथे गेल्यावर ते सोन्याची तपासणी करतात. त्यानंतर काही आवश्यक कागदपत्रं मागितली जातात आणि अर्जात आपली माहिती द्यावी लागते. अर्ज/तपासणी वगैरे झाल्यावर तातडीने हे कर्ज मंजूर केलं जातं.

तुमच्याकडे असलेल्या सोन्याचं मूल्य किती आहे, त्यावर किती कर्ज मिळणार हे अवलंबून असतं. 'टीव्ही नाइन हिंदी' ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. किती कर्ज मिळणार, याचे निकष आणि नियम बँक किंवा प्रत्येक संस्थेनुसार वेगवेगळे असतात. स्टेट बँक ऑफ इंडिया 20 हजार रुपयांपासून 20 लाख रुपयांपर्यंत गोल्ड लोनच्या स्वरूपात देऊ शकते. मुथुट फायनान्स कंपनी कमीत कमी अगदी 1500 रुपयांचं गोल्ड लोनही देते. त्या कंपनीच्या गोल्ड लोनला उच्चतम सीमा (Upper Limit) नाही.

(हे वाचा:ही सरकारी कंपनी देत आहे 2 कोटी जिंकण्याची संधी, या क्रमांकावर पाठवावा लागेल SMS  )

विविध बँका/संस्थांचे गोल्ड लोनवरचे व्याजदर असे आहेत -

मणप्पुरम फायनान्स - 29 टक्क्यांपर्यंत

मुथुट फायनान्स - 24 % ते 26 %

अॅक्सिस बँक - 13 %

एसबीआय - 7 ते 7.5 %

आयसीआयसीआय बँक - 7.4 %

एचडीएफसी बँक - 8.9 ते 17.23 %

कॅनरा बँक - 7.35 %

First published:

Tags: Corona, Covid-19, Gold, Instant loans, Money