ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्सना SAIL मध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

Steel Authority of India, Jobs - स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 205 जागांवर व्हेकन्सीज आहेत. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 02:23 PM IST

ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्सना SAIL मध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

मुंबई, 23 जुलै : स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं ( SAIL ) एक्झिक्युटिव्ह आणि नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी व्हेकन्सी काढल्यात. या पदांसाठी 31 जुलैच्या आधी अर्ज करावा, असं कंपनीनं सांगितलंय.

एक्झिक्युटिव्ह आणि नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची ऑफिशियल वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करा. SAIL मध्ये एकूण 205 व्हेकन्सीज आहेत. त्यात 29 पदं एक्सिक्युटिव्हसाठी आहेत आणि 176 पदं नाॅन एक्झिक्युटिव्हसाठी आहेत.

4 दिवसांनी पेट्रोल झालं महाग, 'या' आहेत आजच्या किमती

दोन्ही डिपार्टमेंटच्या पदासाठी अर्ज करणारे SC आणि ST उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट आहे. OBC उमेदवाराला 3 वर्षांची सूट आहे.

अर्ज फी

Loading...

एक्झिक्युटिव्ह पदासाठी फी आहे 500 रुपये. ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी), ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) पदासाठी फी आहे 250 रुपये.  सर्व उमेदवारांनी sail.co.in इथे क्लिक करावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2019 आहे.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दर महिन्याला घ्या फायदा

शैक्षणिक पात्रता

मॅनेजमेंटसाठी अर्ज करणारा उमेदवार Fire Engineering मध्ये पदवी मिळवलेला असावा. Junior Manager (Safety)साठी अर्ज करणारा मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीकडून इंजीनियरिंगमध्ये पदवी मिळवलेला असावा. डेप्युटी मॅनेजरसाठी उमेदवाराकडे Mechanical Engineering ची पदवी हवी.

Fire Operator (Trainee)कुठल्याही शाखेची ग्रॅज्युएट हवा. सोबत त्यानं नागपूरच्या National Fire Service Collegeमधून कोर्सही केलेला असावा. त्याच्याकडे हेवी मोटर्सचं ड्रायव्हिंग लायसन्स असावं.

चहलने सरकारी नोकरीसाठी फिल्डिंग करताना घातला होता चष्मा!

दरम्यान,मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

VIDEO: पुण्याच्या जागेवर हक्क आमचाच, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 23, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...