मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेअर बाजार गडगडला; 2 लाख कोटींचं नुकसान

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेअर बाजार गडगडला; 2 लाख कोटींचं नुकसान

Sensex, Share Market - मोदी सरकारच्या निर्णयानं शेअर मार्केटमध्ये हाहाकार पाहायला मिळाला

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : शेअर बाजारात सगळीकडून विक्री झाल्यानं शेअर बाजारात मोठी घसरण होऊन बाजार बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेवटी सेन्सेक्स 560.45 अंकांवर घसरून 38,337वर बंद झाला. तर निफ्टी 117.65 अंकांच्या घसरणीनं 11, 419.25 स्तरावर बंद झाला. शेअर बाजाराची ही स्थिती दोन महिन्यातली सर्वात घसरणीची आहे.  सेन्सेक्स 30च्या 26 शेअर्समध्ये घसरण होती. निफ्टी 50 च्या 43 शेअर लाल निशाणावर राहिली. तज्ज्ञांच्या मते एफपीआयवर सरचार्जला घेऊन निराशा होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की परदेशी गुंतवणूकदार वाढलेल्या सरचार्जवर सवलत मागतायत. त्यांनी कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन करून गुंतवणूक करावी. यामुळेच शेअर बाजाराची स्थिती घसरली, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री केलीय.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी सांगितलं की, सरकारच्या या निर्णयानं शेअर बाजारावर परिणाम झालाय. अशात शेअर बाजाराची घसरण वाढत जाण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारचं नवं विधेयक, बँकेच्या 'या' व्यवहारासाठी वाढणार टॅक्स

त्यांनी सांगितलं की, या काळात म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक वाढेल. गुंतवणूकदारांनी चांगलं फंडामेंटल आणि गुड गव्हर्नेसवाल्या कंपनींच्या शेअरमध्ये पैसे गुंतवायला हवेत. म्युच्युअल फंडातले SIP सुरूच ठेवायला हवेत. शिवाय सरकारी बाॅण्ड्सवाल्या योजनाही घेतल्या पाहिजेत.

सोनं कडाडण्याची शक्यता, प्रति तोळे असेल 'इतका' भाव

गुंतवणूकदारांचे बुडाले 2 लाख रुपये

शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचे एका दिवसात 2.08 लाख कोटी रुपये बुडालेत. गुरुवारी लिस्टेड कुल कंपनींचा मार्केट कॅप 1,47,46,534.89  कोटी रुपये होता. तो आज 2,08,149.77 कोटी रुपयांनी घसरून 1,45,38,385.12 कोटी रुपये झालाय.

एजंट स्मिथपासून राहा सावधान, नाही तर एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

सर्वात जास्त पडणारे शेअर्स

एमअँडएममध्ये 4.39%, बजाज फायनान्स 4.20%, बजाज फिनसर्व 3.87%, आयशर मोटर्स 3.84% आणि इंडसइंड बँक 3.56% घसरले. तर  एनटीपीसीमध्ये 2.20%, टाइटममध्ये 1.01%, कोल इंडियामध्ये  0.82%, टीसीएसमध्ये 0.68% आणि पावरग्रिडमध्ये 0.51% तेजी पाहायला मिळाली.

VIDEO : मुख्यमंत्री होणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या