नोकरदारांसाठी मोदी लवकरच करू शकतात मोठी घोषणा

नोकरदारांसाठी मोदी लवकरच करू शकतात मोठी घोषणा

नोकरदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीचे पैसे महत्त्वाचे असतात. प्रॉव्हिडंट फंडबद्दल EPFO म्हणजेच एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या आठवड्यात एक मोठा निर्णय घेऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : नोकरदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीचे पैसे महत्त्वाचे असतात. प्रॉव्हिडंट फंडबद्दल EPFO म्हणजेच एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या आठवड्यात एक मोठा निर्णय घेऊ शकते.

प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीचं व्यवस्थापन करणारी एजन्सी बदलण्याचा EPFO चा विचार आहे. देशभरातल्या संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांसोबत बैठक घेऊन EPFO याबदद्लचा निर्णय घेणार आहे.

HSBC AMC, UTI AMC आणि SBI म्युच्युअल फंड या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, HSBC, UTC आणि SBI ही नावं अंतिम करण्यात आली आहेत. या कंपन्यांची नियुक्ती 1 ऑक्टोबर 2019 पासून 3 वर्षांसाठी होईल. 21 ऑगस्टला EPFO च्या ट्रस्टींची बैठक होणार आहे.

अंडरवेअर्सच्या विक्रीत घट, डेटिंग वाढलं, हे आहे आर्थिक मंदीचं कनेक्शन!

प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा 1 एप्रिल 2015 ला बनवण्यात आली होती. यानुसार EPFO च्या निधीपैकी 50 टक्के निधी हा सरकारी सुरक्षेमध्ये गुंतवता येतो. उरलेला 45 टक्के निधी कर्ज सुरक्षेत आणि 5 टक्के निधी शेअर्समध्ये गुंतवता येतो. सरकारी सुरक्षा आणि डेट बाँड्सवर दरवर्षी 7 टक्के रिटर्न मिळतो. शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर 16 टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स मिळतात.

6 वर्षांच्या मुलीनं कमावले 55 कोटी, पाच मजली इमारत केली खरेदी

==========================================================================================================

VIDEO: जायकवाडी धरणाचा नयनरम्य नजारा, 3 वर्षात पहिल्यांदा 92 टक्के भरलं

Published by: Arti Kulkarni
First published: August 17, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading