नोकरदारांना मोदी सरकार देणार खूशखबर! 2 मोठे निर्णय होण्याची शक्यता

नोकरदारांना मोदी सरकार देणार खूशखबर! 2 मोठे निर्णय होण्याची शक्यता

देशभरातल्या नोकरदारांना मोदी सरकार एक खूशखबर देणार आहे. आता कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन दुप्पट होऊ शकते. त्याचबरोबर आणखीही दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : देशभरातल्या नोकरदारांना मोदी सरकार एक खूशखबर देणार आहे. आता कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन दुप्पट होऊ शकते. त्याचबरोबर आणखीही दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल ब्युरो ऑफ ट्रस्टींची हैदराबादमध्ये एक बैठक होतेय. या बैठकीत किमान निवृत्ती वेतन 1 हजार रुपयांवरून 2 हजार रुपये करण्यावर विचार होऊ शकतो. या बैठकीत पेन्शनमध्ये वाढ करण्याबद्दल सहमती झाली तर पीएफ खातेधारकांना याचा फायदा होणार आहे.

जिथे तुम्ही नोकरी करता तिथे दर महिन्याला पगारातून प्रॉव्हिडंट फंडचे पैसे कापले जातात. ते EPFO मध्ये जमा होतात. 12 टक्के पैसे कंपनीकडून जमा होतात. कंपनी जे पैसे जमा करते त्यातले 8.33 टक्के पैसे पेन्शन योजनेत जमा होतात आणि बाकीचे 3.67 टक्के पैसे EPF मध्ये जातात. हैदराबादच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.

1. पहिला निर्णय : किमान पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी सरकारने EPFO शी चर्चा केली आहे. याआधी EPFO ने वाढीव निधी नसल्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करायला नकार दिला होता.शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केल्यानंतर आता सरकार आता कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्यावर विचार करतं आहे.

2. दुसरा निर्णय : प्रॉव्हिडंट फंडाच्या पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी सरकार HSBC AMC, UTI AMC और SBI म्युच्युअल फंड यांची नियुक्ती करू शकतं. हा निर्णय एप्रिलपासून प्रलंबित आहे.

1 लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, दरमहा मिळवा हजारो रुपये

EPF पेन्शनचे पैसे कधी मिळतात ?

PF खात्यामधली रक्कम कर्मचारी एका ठरविक मुदतीनंतर काढू शकतो पण पेन्शनची रक्कम काढायची असेल तर काटेकोर नियम आहेत.

1. नोकरीमध्ये 6 महिने झाले असतील आणि 9 वर्षं 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीची नोकरी असेल तर फॉर्म 19 आणि 10c जमा करून पीएफसोबत पेन्शनची रक्कमही काढता येते. पण यासाठी प्रॉव्हि़डंट फंडाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो.

SBI डेबिट कार्ड रद्द करण्याच्या तयारीत, असे काढता येणार पैसे

2.पेन्शन फंड ऑनलाइन प्रक्रियेने काढता येत नाही. फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म EPFO च्या कार्यालायतच जमा करावा लागतो.

3. जर तुम्ही प्रॉव्हिडंट फंड एका खात्यातून दुसऱ्या खात्यात टाकलात तर तुम्ही पेन्शनची रक्कम काढू शकत नाही.

4. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केलीत तरीही नोकरीची 10 वर्षं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पेन्शनसाठी दावेदार बनता. 58 वर्षांचं झाल्यावर तुम्हाला मासिक पेन्शनच्या रूपात वेतन मिळत राहातं.

====================================================================================================

ईडीकडून चिदंबरम यांना लुक आऊट नोटीस, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

Published by: Arti Kulkarni
First published: August 21, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या