मोदी सरकार वाढवणार GST चे दर, या वस्तू होणार महाग

मोदी सरकार वाढवणार GST चे दर, या वस्तू होणार महाग

गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच GST ची वसुली वाढवण्यासाठी काय करता येईल यावर विचार करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची एक बैठक होतेय. यामुळे काही वस्तू महागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच GST ची वसुली वाढवण्यासाठी काय करता येईल यावर विचार करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली आहे. यामध्ये GST दर वाढवण्यावर आणि GST स्लॅबमध्ये बदल करण्यासाठी अनेक सूचनांवर विचार केला जाईल.या बैठकीत GST चे दर, GST स्लॅब आणि कॉम्पेन्सेशन सेसवर चर्चा होईल आणि त्यात बदल करण्याची शिफारस केली जाईल.

GST चे दर वाढणार?

GST ची वसुली कमी झाल्यामुळे यावर काय उपाय करता येतील यावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात राज्यांकडून याबद्दल सूचना मागवल्या होत्या. यानुसार GST चे दर वाढवण्यावर रणनीती ठरेल. ज्या वस्तू आता GST च्या कक्षेत येत नाहीत त्या वस्तूही GST स्लॅबमध्ये आणाव्या, अशाही सूचना आल्या आहेत.

या गोष्टी महागणार

रॉ सिल्क, लक्झरी हेल्थकेअर, हाय व्हॅल्यूम होम लिजिंग, ब्रँडेड सिरियल्स, पिझ्झा, रेस्टॉरंट, क्रूझ शॉपिंग, प्रिंट अॅडव्हर्टायझिंग, एसी ट्रेन तिकिटं, ऑलिव्ह ऑइल अशा वस्तूंच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यातून GST ची वसुली वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.

(हेही वाचा : खाजगी क्षेत्रांत आरक्षण मिळणार का? मोदी सरकारने संसदेत दिलं हे उत्तर)

GST स्लॅबमध्ये बदल

याशिवाय GST स्लॅबमध्ये बदल करण्याची चर्चा आहे. सगळ्यात कमी स्लॅब 5 टक्के आहे. तो वाढवून 6 ते 8 टक्के करण्याची शिफारस राज्यांनी केली आहे. GST च्या दरात बदल केल्यामुळे कपडे, हॉटेलिंग अशा वस्तू महागणार आहेत. GST ची अमलबजावणी योग्य रितीने करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या सूचना मागवल्या आहेत. त्यासोबतच व्यापक उपाय करून हा महसूल वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.

============================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 12, 2019, 11:13 AM IST
Tags: GSTmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading