तुमची जुनी कार, वॉशिंग मशिन, टीव्ही सरकारला विका आणि फायदा मिळवा

तुमची जुनी कार, वॉशिंग मशिन, टीव्ही सरकारला विका आणि फायदा मिळवा

तुम्हाला जर जुनी गाडी, एसी, वॉशिंग मशिन आणि फ्रिज विकून टाकायचा असेल तर मोदी सरकारने एक नवी योजना आणली आहे. तुमच्याकडच्या या जुन्या वस्तू तुम्ही सरकारला विकू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : तुम्हाला जर जुनी गाडी, एसी, वॉशिंग मशिन आणि फ्रिज विकून टाकायचा असेल तर मोदी सरकारने एक नवी योजना आणली आहे. तुमच्याकडच्या जुन्या वस्तू तुम्ही सरकारला विकू शकता. भंगार वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सरकारने स्टील स्क्रॅपेज पॉलिसी बनवली आहे. यामध्ये भंगारात टाकण्याच्या वस्तू गोळा करण्यासाठी एक सेंटर बनवलं जाईल. या सेंटर्समध्ये जाऊन तुम्ही जुन्या वस्तू देऊ शकता. सगळ्या प्रकारचं स्टील इथे गोळा केलं जाईल.

हा आहे या योजनेचा उद्देश

या जुन्या वस्तू भंगारात दिल्याबद्दल सरकार भत्ते देईल. या भत्त्यांमुळे लोक जास्तीत जास्त जुन्या वस्तू आणून देतील आणि या स्टीलचा पुनर्वापर करता येईल असा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना अमलात आणायला 10 दिवस लागतील.

जुन्या वस्तू या सेंटर्समध्ये दिल्या तर त्या पुनर्वापरासाठी उपयोगी येतीलच. शिवाय जुन्या गाड्या विक्रीसाठी काढल्या तर लोक नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी पुढे येतील. त्यामुळे गाड्यांची विक्रीही वाढेल आणि कार उद्योगाला उभारी मिळेल, हाही यामागचा विचार आहे. कार कंपन्यांनी आता गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहेत.

(हेही वाचा : OLA ने सुरू केली नवी सेवा, कार भाड्याने घ्या आणि स्वत: चालवत हवं तिथे जा)

या योजनेमुळे पोलादाची आयातही कमी होईल आणि जुनं पोलाद वापरण्याजोगं बनेल. भारतात दरवर्षी 60 लाख टन जुनं पोलाद आणलं जातं पण पोलादाची मागणी यापेक्षा जास्त आहे.

=====================================================================================

VIDEO :...म्हणून लुंगी नेसली, आदित्य ठाकरेंचा खुलासा

Published by: Arti Kulkarni
First published: October 18, 2019, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading