मोदी सरकार लाखो नोकरदारांना देणार खूशखबर, ग्रॅच्युटीचा नियम बदलणार?

मोदी सरकार लाखो नोकरदारांना देणार खूशखबर, ग्रॅच्युटीचा नियम बदलणार?

सध्याच्या काळात तुम्ही 5 वर्षं नोकरी केलीत तर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते. पण आता मात्र सरकार हा नियम बदलणार आहे. आता तुम्ही 1 वर्ष नोकरी केलीत तरी तुम्हाला ग्रॅच्युटी मिळू शकेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : सध्याच्या काळात तुम्ही 5 वर्षं नोकरी केलीत तर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते. पण आता मात्र सरकार हा नियम बदलणार आहे. आता तुम्ही 1 वर्ष नोकरी केलीत तरी तुम्हाला ग्रॅच्युटी मिळू शकेल. यासाठी सरकार हिवाळी अधिवेशनात एक विधेयक आणण्याची शक्यता आहे.

सध्या मात्र सरकारने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. संसदेच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक सादर होणार की नाही याबदद्लचीही ठोस माहिती कळू शकलेली नाही. फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा 2019 वर एक मसुदा तयार केला आहे. यावर नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत.

ग्रॅच्युटीची मर्यादा 20 लाख रुपये

यावर्षी हंगामी अर्थसंकल्पात सरकारने ग्रॅच्युटीची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली. त्यामुळे 5 वर्षांनी नोकरी सोडली तर जास्तीत जास्त 20 लाख रुपये मिळू शकतात.

(हेही वाचा : मोदी सरकार घेऊ शकतं नोटबंदीसारखा मोठा निर्णय, नवे नियम होणार लागू)

5 वर्षं नोकरी केली तर मिळते ग्रॅच्युटी

ज्यांची सलग 5 वर्षं नोकरी होते त्यांना नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युटी मिळते. त्याआधी ही रक्कम मिळत नाही. आता मात्र 1 वर्ष नोकरी केली तरी ग्रॅच्युटी मिळू शकेल.

ग्रॅच्युटी म्हणजे काय ?

कर्मचाऱ्यांसाठी कंपनी हा जादा लाभ देते. त्या कर्मचाऱ्याचा पगार आणि कंपनीमध्ये केलेल्या कामाचा कालावधी यावर ग्रॅच्युटी अवलंबून असते.

======================================================================================

VIDEO : 'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading