खूशखबर! मोदी सरकार इनकम टॅक्समध्ये करणार कपात, अर्थमंत्र्यांचे संकेत

खूशखबर! मोदी सरकार इनकम टॅक्समध्ये करणार कपात, अर्थमंत्र्यांचे संकेत

इनकम टॅक्सच्या स्लॅबबमध्ये लवकरच बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. लोकांची क्रयशक्ती वाढली की बाजारपेठेत वस्तूंना मागणी वाढेल आणि मग पुरवठाही त्या प्रमाणात वाढेल, असा यामागचा विचार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : इनकम टॅक्सच्या स्लॅबबमध्ये लवकरच बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. लोकांची क्रयशक्ती वाढली की बाजारपेठेत वस्तूंना मागणी वाढेल आणि मग पुरवठाही त्या प्रमाणात वाढेल, असा यामागचा विचार आहे. खासगी क्षेत्रातली कमी गुंतवणूक आणि मागणीमध्ये आलेली घट यामुळे अर्थव्यवस्था संकटात आहे. यासाठीच एक उपाय म्हणून इनकम टॅक्समध्ये कपात करण्याचा सरकारचा मानस आहे.

बजेटपर्यंत पाहावी लागेल वाट

हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, सरकार अनेक उपायांवर विचार करतंय. इनकम टॅक्समध्ये कपात करणं हा त्यातलाच एक मार्ग आहे. पण यासाठी बजेटपर्यंत वाट पाहावी लागेल, असंही त्या म्हणाल्या.2020-2021 या आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी 2020 मध्ये बजेट सादर केलं जाईल.

GDP 4.5 टक्क्यांवर

भारताच्या आर्थिक विकासाचा दर 4.5 टक्के झालाय. हा गेल्या काही महिन्यांतला नीचांक आहे. त्याचबरोबर 8 प्रमुख क्षेत्रांतलं उत्पादनही कमी झालं आहे. यामध्ये कोळसा, वीजपुरवठा, पोलाद अशा उद्योगांचा समावेश आहे. ऑटो सेक्टर आणि रिअल इस्टेटही संकटात आहे.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! YONO अ‍ॅप वापरून करा शॉपिंग)

सरकारचे प्रयत्न

अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने गेल्या 4 महिन्यांत काही पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारने गेल्या सप्टेंबर महिन्यात कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता.सरकारच्या खजिन्यावर यामुळे 1.45 लाख कोटी रुपयांचा परिणाम झालाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने मागच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत,व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. महागाईच्या दिवसात इनकम टॅक्समध्ये कपात होणार असेल तर तो सामान्य माणसासाठी मोठा दिलासा ठरेल.

===============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 04:38 PM IST

ताज्या बातम्या