सामान्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार माफ करणार कर्ज

सामान्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार माफ करणार कर्ज

देशभरातल्या छोट्या कर्जदारांना मोदी सरकार मोठी भेट देण्याची शक्यता आहे. या कर्जदारांचं कर्ज माफ करण्याची घोषणा सरकार करू शकतं. यासाठी सरकारने एक योजना बनवली आहे. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी मात्र घालण्यात आल्या आहेत.

  • Share this:

दिल्ली, 19 ऑगस्ट : देशभरातल्या छोट्या कर्जदारांना मोदी सरकार मोठी भेट देण्याची शक्यता आहे. या कर्जदारांचं कर्ज माफ करण्याची घोषणा सरकार करू शकतं. यासाठी सरकारने एक योजना बनवली आहे. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी मात्र घालण्यात आल्या आहेत.

ज्यांचं वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशा लोकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर या कर्जदारांकडे 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीची मालमत्ता असेल तरच ते या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. या कर्जदारांवरचं कर्ज 35 हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये अशीही अट घालण्यात आली आहे.

घर असेल तर कर्जमाफी नाही

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखीही अटी घालण्यात आल्या आहेत. कर्जदाराचं स्वत:चं घर असेल तरीही त्याचं कर्ज माफ होणार नाही ही सुद्धा यातली प्रमुख अट.

कॉर्पोरेट क्षेत्रासाठीचे सचिव इंजेती श्रीनिवास यांनी सांगितलं की, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी ही योजना बनवण्यात आली आहे. ज्यांच्यावर कर्जाचा भार आहे आणि ते खरोखरच कर्ज चुकवू शकत नाहीत अशाच लोकांचा विचार या कर्जमाफीसाठी केला जाईल.

5 वर्षात एकदा कर्जमाफीचा फायदा

या योजनेमध्ये लाभार्थीला एकदा फायदा मिळाला की मग पुढची 5 वर्षं त्याला कर्जमाफी देण्यात येणार नाही. देशभरातल्या लोकांची गेल्या 4 ते 5 वर्षांतली कर्जमाफी मिळून 10 हजार कोटींपेक्षा जास्त नसेल, असंही इंजेती श्रीनिवास यांनी म्हटलं आहे. देशभरातली वाढती बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची घसरण थांबवण्यासाठी मोदी सरकारने विशेष पावलं उचलली आहेत. छोट्या कर्जदारांची कर्जमाफी हाही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

WhatsAppचं बदललं नाव, तुमच्या फोनमध्ये आता असं दिसणार अ‍ॅप

==========================================================================================

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या