इनकम टॅक्सचा हा नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम

इनकम टॅक्सचा हा नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम

मोदी सरकार इनकम टॅक्सबदद्ल एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रसारमध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, सरकार डिव्हिडंट डिस्ट्रिब्युशन टॅक्स मध्ये बदल करू शकतं.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : मोदी सरकार इनकम टॅक्सबदद्ल एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रसारमध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, सरकार डिव्हिडंट डिस्ट्रिब्युशन टॅक्स मध्ये बदल करू शकतं. यावर विचार सुरू आहे. ब्लूमबर्ग या न्यूज एजन्सीने दिलेल्या बातमीनुसार, कंपनीच्या शेअरधारकांना आता डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स (DDT)द्यावा लागेल, अशी शक्यता आहे. आधी हा कर कंपनी देत होती.

हा बदल केला तर परदेशी गुंतवणूक वाढू शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे सरकारला हा बदल करायचा आहे.

डिव्हिडंट डिस्ट्रीब्युशन टॅक्सच्या माध्यमातून दरवर्षी 60 हजार कोटी रुपये सरकारी खजिन्यात येतात. सरकारच्या नव्या योजनेमुळे यावर काही फरक पडणार नाही. 1 फेब्रुवारी 2020 ला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाक सरकार हा प्रस्ताव मांडू शकतं. सध्या डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स म्हणजेच DDT कंपन्यांना द्यावा लागतो. पण हा बदल झाल्यानंतर शेअरधारकांना चुकवावा लागेल.

DDT काय आहे?

आपल्या शेअरधारकांना डिव्हिडंड देण्याआधी भारतीय कंपन्यांना 15 टक्के डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणजेच DDT द्यावा लागतो.

(हेही वाचा : Facebook Pay : Whats App, Messenger आणि Instagram ने करता येणार पेमेंट)

1. भारत सरकार हा कर कंपन्यांवर लावतं. एखाद्या आर्थिक वर्षात स्वदेशी कंपन्यांकडून मिळालेल्या रकमेत 10 लाख रुपयांपर्यंत डिव्हिडंडवर करात सूट मिळते. म्हणजे गुंतवणूकदाराला यावर कर द्यावा लागत नाही.

2. एखाद्या परदेशी कंपनीला आपल्या शेअरधारकांना दिल्या जाणाऱ्या डिव्हिडंड वर DDT मध्ये सूट दिली जाते. त्याचवेळी परदेशी कंपनीकडून मिळालेल्या डिव्हिडंडवर गुंतवणूकदारांना कर द्यावा लागतो.

3. म्युच्युअल फंडमधून मिळालेला डिव्हिडंड गुंतवणूकदारांसाठी टॅक्स फ्री आहे. पण डेट फंडसाठी 25 टक्के दराने DDT द्यावा लागतो. इक्विटी फंडासाठी हा दर 10 टक्के आहे.

=================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 13, 2019, 7:14 PM IST

ताज्या बातम्या