हे 3 कर रद्द करू शकतं मोदी सरकार, तुमच्यावर होणार थेट परिणाम

हे 3 कर रद्द करू शकतं मोदी सरकार, तुमच्यावर होणार थेट परिणाम

केंद्र सरकारने दिवाळीनंतर सामान्य लोकांसाठी एक मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना STT, DDT, LTCG या मोठ्या करांतून सुटका मिळू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : केंद्र सरकारने दिवाळीनंतर सामान्य लोकांसाठी एक मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना STT, DDT, LTCG या मोठ्या करांतून सुटका मिळू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हे कर रद्द करणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना याचा थेट फायदा होईल. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांनाही यामुळे दिलासा मिळेल.

तज्ज्ञांच्या मते, हे कर रद्द झाले तर सेन्सेक्स आणि निफ्टी उंचावेल. शेअर्सची खरेदी-विक्री करणाऱ्यांना यातून जास्त फायदा मिळू शकेल. याबरोबरच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या काही दिवसांत ही घोषणा करू शकतात. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी याचा फायदा होईल. त्याचबरोबर शेअर बाजारातही तेजी येईल.

(हेही वाचा : मोदी सरकार घेऊ शकतं नोटबंदीसारखा मोठा निर्णय, नवे नियम होणार लागू)

DDT होणार रद्द ?

शेअर बाजारात जास्त पैसे येण्यासाठीही याची मदत होईल. SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांनाही याचा चांगला फायदा मिळेल. शेअर बाजारात शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर कर लागतो. जेव्हा तुम्ही कोणतेही शेअर्स खरेदी करता तेव्हा त्याच्या किंमतीत करही असतो.आपल्या शेअरधारकांना डिव्हिडंड देण्याआधी भारतीय कंपन्यांना 15 टक्के डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स म्हणजेच DDT द्यावा लागतो. भारत सरकार हा कर कंपन्यांवर लावतं. आता सरकार हा DDT रद्द करू शकतं.

================================================================================

VIDEO : सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा? जाणून घ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी फक्त दीड मिनिटात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 09:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading