जुन्या गाड्यांसाठी आता मोदी सरकारचं नवं धोरण, आज झाली ही घोषणा

जुन्या गाड्यांसाठी आता मोदी सरकारचं नवं धोरण, आज झाली ही घोषणा

2020 पर्यंत BS - 4 गाड्या चालू राहतील, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठीच्या धोरणाला कॅबिनेटची लवकरच मंजुरी मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : 2020 पर्यंत BS - 4 गाड्या चालू राहतील, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठीच्या धोरणाला कॅबिनेटची लवकरच मंजुरी मिळणार आहे. सरकारी विभागांसाठी नव्या गाड्यांची खरेदी केली जाईल, असंही त्या म्हणाल्या.

जुन्या BS - 4 गाड्या निकालात काढून इलेक्ट्रिक कारना उत्तेजन देण्याचं सरकारचं धोरण आहे. असं असलं तरी 31 मार्च 2020 पर्यंत खरेदी केलेल्या BS - 4 गाड्या त्यांच्या नोंदणीच्या मुदतीपर्यंत सुरूच राहतील, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

खूशखबर : शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा

कार उद्योगात सलग 9 महिने मंदी आहे. जुलै महिन्यात झालेली कारची विक्री गेल्या 18 वर्षांतली सर्वात कमी विक्री होती. या महिन्यात कारच्या विक्रीत 31 टक्के घसरण झाली. कार उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे, असं त्या म्हणाल्या.

होमलोन आणि कारसाठीचं कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. रेपो रेटनुार हे कर्ज स्वस्त करण्याला बँकांनी मंजुरी दिली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कर्ज मंजूर झालं आहे की नाही याबद्दल ग्राहक ऑनलाइन पडताळणी करू शकतात, असं त्या म्हणाल्या.

=======================================================================================================

SPECIAL REPORT: डीजे बंदीचा पुणेरी घोळ! डॉल्बीनंतर आता ढोलताशांवरही कडक निर्बंध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या