नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरच पीएफ (PF) खातेधारकांच्या किमान पेन्शनच्या (Pension) रकमेत वाढ करू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असून, त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेणं हा या बैठकीतील चर्चेचा मुख्य विषय आहे.
सीबीटीची बैठक आधी 16 नोव्हेंबरला होणार होती, पण नंतर ती पुढे ढकलण्यात आली. सीबीटीची शेवटची बैठक मार्च 2021मध्ये श्रीनगरमध्ये झाली होती. या बैठकीत व्याजदर वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती. ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी अनिवार्य असलेली सेवानिवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि मालक दोघेही समान योगदान देतात. आपल्या देशात कोट्यवधी लोक ईपीएफओचे म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहेत.
RBIचे राज्यातील या बँकेवर निर्बंध! काढता येणार नाही ₹5000 पेक्षा जास्त रक्कम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कामगार संघटनांनी किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 6,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसंच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा पैसा खासगी कॉर्पोरेट बाँडमध्ये (Corporate Bond) गुंतवण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पेन्शन फंडाच्या व्याजदरावरही निर्णय घेतला जाऊ शकतो. सीबीटी बैठकीचे मुद्दे आणि अजेंडा तयार केला जात आहे.
या बैठकीत सीबीटी अर्थात केंद्रीय विश्वस्त मंडळ किमान पेन्शन वाढवण्याचा तसंच सध्याच्या व्याजदर (Interest Rate) कायम ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत ईपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर सध्या असलेला 8.5 टक्के व्याजदर कायम राहू शकतो, व्याजदरात कोणताही बदल केला जाण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वर्षभरात 250 टक्के रिटर्न देणारा स्टॉक आज All time high वर, तुमच्याकडे आहे का?
सीबीटीने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सभासदांच्या खात्यांमधील ईपीएफ ठेवींवर वार्षिक 8.5 टक्के व्याजदराची शिफारस केली होती. त्याला अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) नुकतीच मान्यता दिली आहे. आता होणाऱ्या आगामी बैठकीत हाच दर कायम राहील तसंच पेन्शनच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ईपीएफओ खातेधारकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र याच वृत्ताची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.