'या' व्यवसायाला जास्त मागणी, महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

Business, Modi Government - तुम्हाला उद्योगधंदा करायचाय? मग मोदी सरकारच्या मदतीनं हा मागणी असलेला व्यवसाय सुरू करा

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 09:17 AM IST

'या' व्यवसायाला जास्त मागणी, महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

मुंबई, 23 जुलै : हल्ली डिस्पोजेबल कप, प्लेट्स, बाउल यांची मागणी वाढतेय. सध्या हाच ट्रेंड आहे. तुम्हाला छोटा व्यवसाय करायचा असेल तर हा चांगला पर्याय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याच व्यवसायाची माहिती पुढीलप्रमाणे -

छोट्या मशीन्सनी करा सुरुवात

डिस्पोजेबल कॅटरिंग प्राॅडक्टची गरज शहरात आणि गावात दोन्ही ठिकाणी असते. ग्रामीण भागात जास्त करून पेपर प्लेटची गरज असते. यासाठी छोट्या मशीननंही काम होऊ शकतं. पेपर कप प्लेट ऑटोमेटिक मशीनची बाजारातली किंमत 2 ते 3 लाख रुपये आहे. मशीन घेतल्यानंतर कच्चा माल खरेदी करावा लागतो. त्यानंतर तुम्ही काम सुरू करू शकता.

फक्त 5 हजार रुपये आणि 8वी पास, Post Office देतेय व्यवसायाची संधी

50 हजार रुपये ते 2 लाखापर्यंत दर महिन्याला कमाई

Loading...

एकदा का वस्तू बनणं सुरू झालं की तुम्हाला मार्केटिंग चांगल्या प्रकारे करायला हवं. अनेक ठिकाणी तुम्हाला तुमचा माल पोहोचवावा लागेल. त्याची अशी वेगळी ओळख बनवावी लागेल. एक किलोग्रॅम कच्च्या मालात 300 प्लेट्स तयार होतात. एक किलो थर्मोकाॅल मटेरियल 200 ते 250 रुपये प्रति किलोग्रॅम मिळतं. तर 100 प्लेट्सना 200 ते 300 रुपये पडतात. अशा प्रकारे तुम्ही एका दिवसात 1 हजार प्लेट तयार बनवल्यात तर, महिन्याला 60 ते 80 हजार रुपये कमाई करू शकता. यात खर्च वजा करून नफा पाहिलात तर 50 हजार रुपये दर महिन्याला कमावू शकता. माल तयार झाल्यावर जे वेस्टेज होतं त्याला रिसायकलिंग करून 50 टक्के किमतीत विकता येतं.

ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्सना SAIL मध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

थर्माकोल प्लेटला मागणी

प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर थर्मोकाॅल प्राॅडक्टमध्ये खूप फायदा आहे. प्लॅस्टिकवर सगळीकडे बंदी घातल्यावर थर्मोकाॅल आणि पेपर प्राॅडक्टची मागणी वाढलीय. थर्मोकाॅल कप-प्लेट बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये खर्च करावे लागतील. सुरुवातीला कसली विक्री करायची हे ठरवावं लागेल. मग कच्चा माल खरेदी करून व्यवसाय सुरू करता येईल.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दर महिन्याला घ्या फायदा

हाॅटेल्स, कंपनी आणि रेस्टाॅरंटशी करता येईल करार

थर्मोकाॅलशिवाय पेपर कप आणि बाउल बनवण्याची मशीन 3 लाख रुपयापर्यंत मिळते. बाजारात काॅफी आणि कोल्डड्रिंक्ससाठी पेपर कप आणि ग्लास वापरले जातात. यात तुम्ही रेस्टाॅरंट किंवा कंपनींशी करार करू शकत असाल, तर त्यांचं लेबल वापरून तुम्ही माल पुरवू शकता. अशा प्रकारे तुम्ही बराच काळ योग्य कमाईचं स्रोत तयार करू शकता.

सरकारची मिळते मदत

सरकार तुम्हाला 90 टक्के कर्ज देते. खादी ग्रामोद्योगमध्येही डिस्पोजेबल कॅटरिंग प्राॅडक्ट मेकिंग व्यवसायाची यादी तयार केलीय. या योजनेत तुम्हाला 25 टक्के सबसिडी दिली जाते.

VIDEO : गाडीत सीटबेल्ट न लावणाऱ्यांसाठी गडकरींचा मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: business
First Published: Jul 24, 2019 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...