मोदी सरकारची खास योजना, व्यवसायासाठी गॅरंटीशिवाय मिळतंय 'इतकं' कर्ज

मोदी सरकारची खास योजना, व्यवसायासाठी गॅरंटीशिवाय मिळतंय 'इतकं' कर्ज

सरकारनं छोट्या उद्योजकांना व्यापार सुरू करण्यासाठी मुद्रा योजना तयार केलीय. यात उद्योजकांना कर्ज दिलं जातं.

  • Share this:

मुंबई, 29 मे : तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करायचाय? पण त्यासाठी तुम्हाला कर्ज हवंय. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही बऱ्याच अडचणींना तोंड देताय. तर तुमच्यासाठी खुशखबर. पंतप्रधान मोदी तुमच्यासाठी एक भेट घेऊन आलेत. सरकारनं छोट्या उद्योजकांना व्यापार सुरू करण्यासाठी मुद्रा योजना तयार केलीय. यात उद्योजकांना कर्ज दिलं जातं. याची खासीयत अशी की, गॅरंटीशिवाय हे कर्ज मिळू शकतं.

भाजपकडून चेकमेट, कर्जतमध्ये रोहित पवारांना धक्का

काय आहे मुद्रा कर्ज योजना?

ही योजना एप्पिल 2015पासून सुरू झाली. यामागचा मुख्य उद्देश सोप्या पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून देणं. सोबत जास्तीत जास्त उद्योगांतून रोजगाराची संधी देणं. मुद्रा योजमेआधी छोट्या उद्योजकांना बँकेकडून कर्ज घेण्यासाठी  बरीच औपचारिकता पूर्ण करावी लागायची. त्यासाठी गॅरंटीही द्यावी लागायची. त्यामुळे उद्योग सुरू करणारे बँकेकडून कर्ज घ्यायला घाबरायचे. पंतप्रधान मुद्रा योजनेचं पूर्ण नाव मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनेन्स एजन्सी (Micro Units Development Refinance Agency) आहे.

धनंजय महाडिकांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागील कारण, म्हणाले...

कोणाला मिळू शकतो फायदा?

याचा फायदा कोणीही घेऊ शकतो. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा अगोदर सुरू असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी तुम्ही या योजनेअंतर्गत 10 लाख रुपये कर्जासाठी अर्ज करू शकता.

गॅरंंटीशिवाय मिळतं कर्ज

मुद्रा योजनेअंतर्गत इथे गॅरंटीशिवाय कर्ज मिळू शकतं. शिवाय कर्जा देण्यासाठी प्रोसेसिंग चार्जही लागत नाही. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 5 वर्षापर्यंतचा करता येऊ शकतो. कर्ज घेणाऱ्याला एक मुद्रा कार्ड मिळतं. याच्या मदतीनं उद्योजक पुढचा खर्च करू शकतो.

भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर विश्वजीत कदमांनी केला खुलासा

कशा प्रकारे मिळतं कर्ज?

या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज मिळतात. शिशू कर्ज- यात तुम्हाला 50 हजारापर्यंत कर्ज मिळतं. किशोर कर्ज - यात तुम्हाला 50 हजारापासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. तरुण कर्ज - यात 5 लाखापासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.

मुद्रा कर्जावर किती व्याज?

इथे निश्चित व्याज दर नाही. विविध बँका मुद्रा कर्जावर वेगवेगळं व्याज वसूल करतात. तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपावर ते ठरतं. सर्वसाधारणपणे कमीत कमी व्याज दर 12 टक्के आहे.

VIDEO: खाकी वर्दीतील गायकाची वरुणराजाला साद

First published: May 29, 2019, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading