महिन्याला खर्च 28.50 रुपये आणि विमा 4 लाख रुपये, सरकारच्या योजनेचा 'असा' घ्या फायदा

महिन्याला खर्च 28.50 रुपये आणि विमा 4 लाख रुपये, सरकारच्या योजनेचा 'असा' घ्या फायदा

या योजनेत तुम्हाला 55 वर्षांपर्यंत लाइफ कव्हर मिळेल. जाणून घ्या याबद्दल-

  • Share this:

मुंबई, 27 मे : मोदी सरकारनं जनतेसाठी अनेक योजना पुढे आणल्यात. त्यात जनतेला सुरक्षा कवच देण्यासाठी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ( PMJJBY ) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ( PMSBY ) लाँच केल्या होत्या. यात एकूण 4 लाख रुपयांचं विमा कव्हर मिळतं, तेही दर वर्षी फक्त 342 रुपये प्रीमियरवर. म्हणजे तुम्ही दर महिन्याला 28.50 रुपयांच्या खर्चावर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

या योजनेत तुम्हाला 55 वर्षांपर्यंत लाइफ कव्हर मिळेल. कुठल्याही कारणानं विमाधारकाचा मृत्यू झाला तर नाॅमिनीला 2 लाख रुपये लाइफ कव्हर मिळेल. 18 ते 50 वर्षापर्यंतची व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. म्हणजे दर महिन्याला 27.5 रुपये.

55 रुपये जमा केलेत तर मिळेल दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन, असं करा रजिस्ट्रेशन

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

या योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू झाला किंवा अपंगत्त्व आलं तर 2 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. कायमस्वरूपी थोडं अपंगत्त्व आलं तर 1 लाख रुपयांचं कव्हरेज मिळू शकतं. 18 ते 70 वर्षापर्यंतचा भारतीय याचा लाभ घेऊ शकतो. याचा वर्षाला प्रीमियम 12 रुपये आहे. दर महिना फक्त 1 रुपया पडतो.

पक्षाचे मतदान 40 हजार, अधिकृत उमेदवाराला मिळाली साडेचार हजार मतं!

दोन्ही योजनांचा मिळून दर महिना 28.50 रुपये खर्च

PMJJBY आणि PMSBY मिळून 4 लाख रुपये विमा मिळू शकतो. कुणाला या दोन्ही योजनांचा फायदा हवा असेल तर दोन्ही योजनांचा प्रीमियम मिळून 342 रुपये वर्षाला आणि 28.50 रुपये दर महिन्याला खर्च येईल.

मेमध्ये द्यावा लागतो प्रीमियम

PMJJBY आणि PMSBY चा वार्षिक प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी द्यावा लागतो. PMJJBY चा वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे तर PMSBY चा वार्षिक प्रीमियम 12 रुपये आहे. दोन इन्शुरन्सचा एकूण प्रीमियम वर्षाला 342 रुपये आहे. मेच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यात पैसे नाही भरले तर तुमचा इन्शुरन्स रद्द होऊ शकतो.

नव्या लोकसभेतील 475 खासदार करोडपती, टॉप थ्री काँग्रेसचे; सेनेचे सर्वजण कोट्यधीश!

कसं करायचं रजिस्ट्रेशन?

या दोन्ही योजनांच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊ शकता. किंवा विमा एजंटशी संपर्क करू शकता.सरकारी विमा कंपनी आणि खासगी विमा कंपनी बँकांसोबत या नव्या योजना घेऊन येतायत. अधिक माहितीसाठी तुम्ही www.jansuraksha.gov.in आणि www.financialservices.gov.in  या वेबसाइटवर पाहू शकता.

VIDEO: ऐतिहासिक विजयानंतर मोदी विश्वनाथाच्या चरणी, केला रुद्राभिषेक

First published: May 27, 2019, 12:58 PM IST
Tags: Insurance

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading