मोदी सरकार रोजगाराच्या योजनेत करतंय मोठे बदल, 'हा' आहे नवा प्लॅन

मोदी सरकार रोजगाराच्या योजनेत करतंय मोठे बदल, 'हा' आहे नवा प्लॅन

सरकार रोजगाराशी संबंधित योजना स्किल इंडिया डेव्हलपमेंटमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मे : सरकार रोजगाराशी संबंधित योजना स्किल इंडिया डेव्हलपमेंटमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. CNBC आवाजला मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारचा फोकस नोकरीच्या मागणीनुसार बदलांकडे असेल. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंडामध्ये हे बदल समाविष्ट असतील.

सूत्रांच्या माहितीनुसार स्किल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण संस्थांना स्वस्त कर्ज देण्याची तयारी आहे. शिवाय खासगी कंपन्यांना इंसेन्टिव देण्याचीही योजना आहे. सरकार स्किल इंडिया स्किममध्ये आर्थिक मदतीतही वाढ करेल. या योजनेत 3,400 कोटी रुपये गुंतवणूक आहे.

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

नीती आयोगानं तयार केला अजेंडा

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितलं की नीती आयोग सरकारसाठी आर्थिक अजेंडा तयार करतंय. यात खासगी गुंतवणूक, कृषी उत्पादन आणि रोजगार वाढवण्यावर भर आहे.

HSC RESULT : बारावी निकाल इथे पाहा एका क्लिकवर

राजीव कुमार म्हणाले, सरकार अर्थव्यवस्थेत वेगानं वृद्धी होण्यासाठी मुख्य सुधारणा करायच्या तयारीत आहे.  हे सगळं 100 दिवसांच्या आता करणार आहेत.

HSC result : 'परश्या.... आर्ची पास झाली रे...', पाहा रिंकूचा निकाल

नीती आयोग आर्थिक अजेंडा करतंय. त्यात खासगी गुंतवणूक, कृषी उत्पादन आणि रोजगार वाढवला जाणार आहे. निवडणुकीत विरोधी पक्षांनी बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला होता. आता पुढच्या 5 वर्षांत देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका हा आयोग निभावणार आहे.

VIDEO: बर्निंग बसचा थरार, शॉर्ट सर्किटमुळे बस जळून खाक

First published: May 28, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading