कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच

कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच

Motor Vehicles Act - मोटर वाहन कायदा लवकरच मंजूर होईल. त्यात असतील हे नवे नियम आणि नवे दंड

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : मोदी सरकारनं लोकसभेत मोटर वाहन कायदा लोकसभेत सादर केलाय. रस्ते अपघाताच्या कारणांना दूर करणं, जे वाहतूक नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणं यासाठी हा कायदा येतोय. जुन्या मोटर वाहन कायद्यात 88 बदल करून हा नवा कायदा आणला जातोय. जुन्या कायद्यात अपघातात मृत्यू झाला तर 5 लाख रुपये आणि जखमी झाले तर अडीच लाख रुपये मिळतात. आता नव्या कायद्यात काय काय आहे ते पाहा

नव्या कायद्यातले प्रस्ताव

1. नव्या कायद्यात दारू पिऊन कार चालवणाऱ्याला दंड 10 हजार रुपये आहे. अगोदर तो 2 हजार रुपये होता.

2. रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपये दंड

3.कार चालवताना मोबाइलवर बोलत असाल तर 5 हजार रुपये दंड आहे. अगोदर तो 1 हजार रुपये होता.

SBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा

4. धोकादायक पद्धतीनं गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड, यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता.

5. ओव्हरलोडिंगवर 20 हजार रुपयांचा दंड

6. सीट बेल्ट न बांधल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई होईल. पूर्वी तो 100 रुपये होता.

7. रहदारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता 500 रुपयांचा दंड

पाकिस्तान झुकलं; भारतासाठी खुली केली एअरस्पेस!

8. अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड

9. वाहनांचा अनधिकृतरित्या वापर केल्यास 5 हजार रुपयांचं दंड, पूर्वी तो 500 रुपये होता

10. 18 वर्षापेक्षा लहान वयाची व्यक्ती कार चालवत असेल तर कारचा मालक दोषी मानला जाईल. अशा वेळी 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाच्या तुरुंगावासाची तरतूद आहे.

11. लायसन्स किंवा कार रजिस्ट्रेशनसाठी आधार नंबर आवश्यक आहे.

कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू, 5 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर

12. लायसन्स संपलं तर तुम्ही नवं लायसन्स  वर्षभराच्या आत बनवू शकता. अगोदर 1 महिन्याच्या आत बनवावं लागायचं.

13. रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे अपघात झाला, तर ठेकेदारापासून संबंधितांवर कारवाई होईल. सहा महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळेल. कारच्या डिझाइनमुळे अपघात झाला, तर सर्व कार्स बाजारातून परत घेतल्या जातील. कारच्या कंपनीला 500 कोटींचा दंड बसू शकतो.

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

First published: July 16, 2019, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading