कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी कायद्यात बदल, 'हे' आहेत नवे 15 कडक नियम

कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी कायद्यात बदल, 'हे' आहेत नवे 15 कडक नियम

Motor Vehicles Act- लोकसभेत मोटर वाहन कायदा मंजूर झालाय. जाणून घ्या त्याबद्दल -

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : लोकसभेत मोटर वाहन कायद्याच्या सुधारणेला मंजुरी मिळालीय. यावेळी रस्ते सुरक्षेसाठी कडक नियम केलेत. अगदी ड्रायव्हिंग करताना केलेली छोटी चूकही महाग पडू शकते. त्यासाठी मोठा दंड द्यावा लागेल. मग अति वेग असो, हेल्मेटशिवाय बाइक चालवणं असो वा दारू पिऊन ड्रायव्हिंग असो खूप मोठा दंड आकारला जाईल. रस्त्यावर अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आणि जखमींना अडीच लाख दिले जातात.

मोटर वाहन कायद्यातले नवे नियम

1. नव्या कायद्यात दारू पिऊन कार चालवणाऱ्याला दंड 10 हजार रुपये आहे. अगोदर तो 2 हजार रुपये होता.

2. रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपये दंड

3.कार चालवताना मोबाइलवर बोलत असाल तर 5 हजार रुपये दंड आहे. अगोदर तो 1 हजार रुपये होता.

4. धोकादायक पद्धतीनं गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड, यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता.

कमी गुंतवणुकीत जास्त फायदा, रोज कमवा 4 हजार रुपये

5. ओव्हरलोडिंगवर 20 हजार रुपयांचा दंड

6. सीट बेल्ट न बांधल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई होईल. पूर्वी तो 100 रुपये होता.

7. रहदारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता 500 रुपयांचा दंड

8. अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

9. वाहनांचा अनधिकृतरित्या वापर केल्यास 5 हजार रुपयांचं दंड, पूर्वी तो 500 रुपये होता

10. 18 वर्षापेक्षा लहान वयाची व्यक्ती कार चालवत असेल तर कारचा मालक दोषी मानला जाईल. अशा वेळी 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाच्या तुरुंगावासाची तरतूद आहे.

11. लायसन्स किंवा कार रजिस्ट्रेशनसाठी आधार नंबर आवश्यक आहे.

12. लायसन्स संपलं तर तुम्ही नवं लायसन्स  वर्षभराच्या आत बनवू शकता. अगोदर 1 महिन्याच्या आत बनवावं लागायचं.

व्याजदर कमी झाले तरी 'या' योजनेत अजूनही दुप्पट होतात तुमचे पैसे

13. रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे अपघात झाला, तर ठेकेदारापासून संबंधितांवर कारवाई होईल. सहा महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळेल. कारच्या डिझाइनमुळे अपघात झाला, तर सर्व कार्स बाजारातून परत घेतल्या जातील. कारच्या कंपनीला 500 कोटींचा दंड बसू शकतो.

14. इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला 2 हजार रुपये दंड पडेल.

15. बसमध्ये तिकिटाशिवाय प्रवास केलात तर 500 रुपये दंड पडेल.

महत्त्वाचे मुद्दे - मोटर वाहन कायदा 1988मध्ये बदल करून मोटर वाहन कायदा 2019 लोकसभेत मंजूर झाला. याआधी 2017मध्येही लोकसभेत या बिलाला मंजुरी मिळाली होती. पण राज्यसभेत हे बिल अडकलं होतं. या नव्या कायद्याप्रमाणे कारचं इंजिन योग्य नसलं तर कंपनीला 500 कोटींपर्यंत दंड आहे.

VIDEO : भन्नाट देसी जुगाड, बाईकवर बसले तब्बल 11 जण!

First published: July 24, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading