मोदी सरकारची मोठी गिफ्ट, आता कार आणि बाइक होणार 'इतके' स्वस्त

मोदी सरकारची मोठी गिफ्ट, आता कार आणि बाइक होणार 'इतके' स्वस्त

Modi, GST - जीएसटी कमी झाल्यानं आता कार आणि बाइक घेणं स्वस्त होईल

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : GST काउन्सिलची बैठक संपली. त्या बैठकीत सर्वसामान्यांना एक भेट मिळाली आहे. काउन्सिलनं बॅटरीवर चालणाऱ्या कार आणि स्कुटरवर लावण्यात येणाऱ्या GSTमध्ये कपात केलीय. त्यामुळे 1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक व्हेइकलवर जीएसटीचे दर 12 टक्क्यांहून कमी होऊन 5 टक्के झालेत. या निर्णयामुळे कार खरेदी करणं 70 हजार रुपयापर्यंत स्वस्त झालंय.

कार खरेदी होणं होईल स्वस्त - 1 ऑगस्टनंतर इलेक्ट्राॅनिक कारवरचा जीएसटी कमी झालाय. तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत इलेक्ट्रिक कार खरेदी करत असाल, तर 1 ऑगस्टनंतर तुमचे 70 हजार रुपये वाचतील. समजा तुम्ही 1 लाख रुपयांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करत असाल तर 7 हजार रुपये कमी खर्च येईल.

काय झाला निर्णय?

GST काउन्सिलच्या बैठकीत इलेक्ट्रिक व्हेइकलवर टॅक्सचे दर 12 टक्के कमी होऊन 5 टक्के झालेत. चार्जरवर जीएसटी दर 18 टक्के कमी होऊन 12 टक्के झालाय. नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होतील.

90 दिवसाचं मूल ते 65 वर्षाच्या व्यक्तीसाठी आहे 'ही' LIC पाॅलिसी

याशिवाय 12 प्रवाशांच्या इलेक्ट्रिक बसच्या खरेदीवर जीएसटी देण्याचा निर्णय झालाय.

फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार महिन्याला दीड लाख

जीएसटी काउन्सिलच्या गेल्या महिन्याच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रिक चार्जर आणि इलेक्ट्रिक व्हेइकल भाड्यानं घेतला तर जीएसटीमध्ये सूट मिळण्याबाबतचा निर्णय अधिकाऱ्यांच्या समितीकडे सोपवला होता.

रात्रीस खेळ चाले : ... म्हणून लग्नानंतर छाया माहेरी परतते

दरम्यान, अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिक कारवर 5 टक्के GST लावण्याची घोषणा केली. तर, इलेक्ट्रिक कार लोनवर सरकार 1.5 लाखाची सुट देणार आहे. इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी 12 टक्क्यावरून 5 टक्के करण्याची मागणी करण्यात येत होती. इलेक्ट्रिक कारला चालना देण्यासाठी सरकार सर्व कमर्शियल कार या 2026 पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचा विचार करत आहे. तर, इलेक्ट्रिक कारसाठी दिल्ली – जयपूर हायवेवर काही चार्जिंग स्टेशन्स देखील तयार करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक कार घ्या कर्जात सुट मिळवा अशी घोषणा केली आहे.

तब्बल 17 तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधला पहिला VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: July 27, 2019, 4:54 PM IST
Tags: GST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading