EXCLUSIVE: नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

EXCLUSIVE: नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

'प्रदुषण करणाऱ्या जुन्या गाड्या विकून नव्या गाड्या घेण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : जगभरात आर्थिक विकास मंदावल्याने त्याचा परिणाम भारतातल्या अनेक क्षेत्रांवर झालाय. त्यात सर्वाधिक फटका बसला तो ऑटो सेक्टरला (Auto Industry). वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने घट झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. अनेक मोठ्या कंपन्यांनी आठवड्यातले काही दिवस कामही बंद ठेवलं होतं. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अनेक सवलतींच घोषणा केली होती. आता मोदी सरकार ऑटो सेक्टरला (Auto Industry) चालना देण्यासाठी काही सवलतींची घोषणा करण्याची शक्यता असून नवीन कार घेणाऱ्यांसाठी ते गिफ्ट ठरणार आहे. 'CNBC-आवाज'ने याबाबतचं EXCLUSIVE वृत्त दिलंय.नितीन गडकरी यांचं रस्तेवाहतूक मंत्रालय या योजनेवर काम करत असून त्याचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे.

सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या 24 कॅरेटचे आजचे भाव

यासंबधातली स्क्रॅप पॉलिसी सरकार आणणार असून रस्ते वाहतूक, परिवहन, पोलाद आणि पर्यावरण मंत्रालय हे धोरण तयार करतेय. या धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार असून 15 दिवसांमध्ये त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. जुन्या झालेल्या व्यावसायिक गाड्यांवर काही बंधनं लावण्यात येणार आहेत. या जुन्या गाड्या विकून नव्या गाड्या घेतल्या तर त्यावर सुट देण्याचा सरकारचा विचार आहे.

एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान

त्याच बरोबर रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्जेस मध्येही घसघशीत सुट देण्याचा विचार सरकार करत आहे. लोकांनी जुन्या गाड्या सोडून नव्या गाड्या घ्याव्यात हा त्या मागचा उद्देश असल्याचं सांगितलं जातंय.जुन्या गाड्या या जास्त प्रदुषण करत असल्याने त्यावर जास्त रोड टॅक्स लावण्यात येणार आहे.

गाड्या 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असल्याच त्याचं रजिस्ट्रेशनचं नुतनीकरावरही जादा टॅक्स लागणार आहे. हा टॅक्स 25 टक्के जास्त असू शकतो असा अंदाजही व्यक्त केला जातोय. यात मोठ्या बसेस, ट्रक, कार, तीन आणि दुचाकी गाड्यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2019, 3:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या