Union Budget 2019 : बँकेतून 'इतके' पैसे काढण्यावर लागू शकतो कर

देशात डिजिटल ट्रॅन्झॅक्शन वाढावं यासाठी ही पावलं उचलली जातायत. अर्थात, अजून यावर विचार सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 05:27 PM IST

Union Budget 2019 : बँकेतून 'इतके' पैसे काढण्यावर लागू शकतो कर

मुंबई, 10 जून : तुम्हाला 10 लाखापेक्षा जास्त पैसे बँकेतून काढायचे असतील, तर तुम्हाला कदाचित टॅक्स भरावा लागेल. मीडियाच्या बातमीनुसार मोदी सरकार वर्षभरात 10 लाखाहून जास्त कॅश काढायची असेल तर त्यावर कर लावण्याचा विचार सुरू आहे. यामागे सरकारचा ठराविक उद्देश आहे. सरकार नोटांचा वापर कमी करून ब्लॅक मनीला आळा घालतंय. देशात डिजिटल ट्रॅन्झॅक्शन वाढावं यासाठी ही पावलं उचलली जातायत. अर्थात, अजून यावर विचार सुरू आहे.

सरकार नेहमी सांगतंय की ज्यामुळे मध्यमवर्ग आणि गरीब यांच्यावर ओझं येईल, असं काही करायचं नाहीय. युपीए सरकारनं 10 वर्ष आधी बँकेच्या पैसे देवाणघेवाणीवर कर लावला होता. पण विरोधामुळे सरकारला तो रद्द करावा लागला.

Union Budget 2019 : अर्थसंकल्पाबद्दल माहिती असायलाच हव्यात अशा 10 गोष्टी

टाइम्स आॅफ इंडियामध्ये आलेल्या बातमीनुसार, मोदी सरकार पैसे काढताना आधार कार्ड अनिवार्य ठेवण्याचा विचार करतंय. त्यामुळे मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तीची ओळख  कळणं सोपं होऊ शकतं. इन्कम टॅक्स रिटर्नमध्येही याचा समावेश करणं सोपं जाईल. सध्या तुम्हाला 50 हजारापेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करायचे असतील तर पॅन कार्ड दाखवावं लागतंय.

वर्षभर या उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय

Loading...

या प्रस्तावावर बजेटच्या आधी चर्चा होतेय. म्हणजे 5 जुलैच्या बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते. सरकारच्या सूत्रांनी सांगितलं की अजून याला अंतिम स्वरूप दिलेलं नाही.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD पेक्षा लवकर दुप्पट होतात पैसे, 'अशी' करा गुंतवणूक

काय असतं पूर्ण बजेट?

नवं सरकार आल्यानंतर वर्षभराच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केला जातो. यालाही पूर्ण बजेट म्हटलं जातं. यानुसार सरकारची मिळकत आणि खर्च सरकार जाहीर करतं. हे पूर्ण वर्षाकरता असतं. पूर्ण बजेटच्या आकड्यांवरून सरकार संसदेला येणाऱ्या आर्थिक वर्षात कशावर किती खर्च केला जाईल, ते सांगतं.

लोकसभा निवडणुकीआधी सादर झालं अंतरिम बजेट

1 फेब्रुवारी 2019 रोजी पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात 5 लाखापर्यंत कमाई असणाऱ्या नोकरदारांना करमुक्त केलं होतं. पण स्लॅबमध्ये काही बदल नव्हते केले.


VIDEO : अतिउत्साह नडला, मुंबईच्या समुद्रकिनारी अडकली कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...