मोदी सरकारकडून 10 हजार कोटींची आयुष्मान सहकार योजना लाँच; या सुविधा मिळणार

मोदी सरकारकडून 10 हजार कोटींची आयुष्मान सहकार योजना लाँच; या सुविधा मिळणार

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं यासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान सहकार योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (National Cooperative Development Corporation) हे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांसाठी सहकारी संस्थांना 10 हजार कोटी रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

सोमवारी घोषणा झालेल्या या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं यासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी सोमवारी व्हर्च्युअल पद्धतीने आयुष्मान सहकार या योजनेचा शुभारंभ केला. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे मॅनेजिंग एडिटर संदीप नायक, देशात सहकारी संस्था ५२ रुग्णालयं चालवत असून यात 5000 खाटा असल्याचं सांगितलं.

(वाचा - 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; महागाई भत्त्याबाबत घेणार निर्णय)

या सुविधा मिळणार

आयुष्मान सहकार या योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रात सुसज्ज रुग्णालय, आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधा, आधुनिकीकरण, विस्तार, दुरूस्त्या, नूतनीकरण आदी विविध आरोग्यक्षेत्राशी निगडित कामं होणार आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय आणि आयुष मंत्रालयाच्या अभ्यासक्रमांचं शिक्षण सुरू करण्यासही ही योनजा उपयुक्त ठरणार आहे.

(वाचा - कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला)

ज्या सहकारी संस्थांमध्ये महिलांची संख्या अधिक, त्यांना 1 टक्के इंट्रेस्ट सबवेंशनही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या सहकारी समित्यांच्या उपनियमांमध्ये आरोग्य सेवा संबंधित बाबींसाठी योग्य तरतूद आहे, त्या एनसीडीसीकडून (NCDC)कर्ज प्राप्त करू शकणार आहेत. ही मदत राज्य सरकारमार्फत किंवा थेट पात्र समित्यांना प्राप्त होणार आहे.

(वाचा - Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीचे दरही उतरले)

शेतकरी विकासाकडे एक पाऊल

सद्यस्थितीत कोरोनामुळे ग्रामीण भागांत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज प्रखरतेनी जाणवली. एनसीडीसीच्या योजना म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी टाकलेलं आणखी एक पाऊल आहे. विशेषत: ग्रामीण भागात सहकारला अधिक महत्त्व आहे. दूग्ध उत्पादनापासून विविध क्षेत्रांत या सहकारी समित्या कार्यरत आहेत. यातील अनेक सहकारी संस्था या रुग्णालयंही चालवतात, असं रुपाला यांनी सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: October 20, 2020, 2:21 PM IST

ताज्या बातम्या