मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांसाठी Good News, कोरोना संकटात मोदी सरकारचा दिलासा

रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांसाठी Good News, कोरोना संकटात मोदी सरकारचा दिलासा

देशातील रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांना (Retail and Wholesale Trade ) मोठा दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

देशातील रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांना (Retail and Wholesale Trade ) मोठा दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

देशातील रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांना (Retail and Wholesale Trade ) मोठा दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 जुलै : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे देशाचा बराच कालावधी हा निर्बंधांमध्ये गेला आहे. कोरोना संकटात व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे. देशातील रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांना (Retail and Wholesale Trade ) मोठा दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. लघू आणि मध्य उद्योग (MSME) गटात  या व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यापाऱ्यांना झालेलं मोठं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

ऐतिहासिक निर्णय - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या निर्णयाचं वर्णन ऐतिहासिक असं केलंय. मोदींनी शनिवारी याबाबत एक ट्विट केलं आहे. "आमच्या सरकारनं रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांचा  MSME गटामध्ये समावेश करुन ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. या निर्णायामुळे देशाती कोट्यावधी व्यापाऱ्यांना कर्ज घेण्यास मदत होईल,तसेच अन्य फायदे देखील मिळतील. या व्यापाऱ्यांच्या उद्योगाला या निर्णयाचा फायदा होणार आहे. आम्ही व्यापाऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी कटीबद्ध आहोत. '' असं पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

गडकरींनी केली घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली होती. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्वाखाली आम्ही MSME वर्गाला सशक्त करण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होईल. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांंमुळे अडीच कोटी रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे." असे गडकरींनी सांगतले.

डाळी होणार स्वस्त! साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सामान्यांना दिलासा

व्यापारी वर्गाकडून स्वागत

रिटेल आणि होलसेल उद्योगांच्या व्यापर संघटनेनं देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया या संघटनेनं दिली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयानंतर या उद्योगांना बँका तसंच आर्थिक संस्थांकडून सहज कर्ज मिळू शकेल, असं मत या संघटनांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Business News, Money, PM narendra modi