सरकारनं 'या' पदासाठी मागवलेत अर्ज, महिना 2.25 लाख रुपये पगार

सरकारनं 'या' पदासाठी मागवलेत अर्ज, महिना 2.25 लाख रुपये पगार

Jobs, Government Jobs - सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल -

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : अर्थमंत्रालयानं रिझर्व्ह बँकेच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकाम झालंय. मंत्रालयानं डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवलेत. ही नियुक्ती सुरुवातीला 3 वर्षासाठी केली जाईल आणि संबंधित व्यक्ती पुनर्नियुक्तीसाठी पात्र होतील.

पदासाठी पात्रता

मंत्रालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार RBIच्या डेप्युटी गव्हर्नरसाठी अर्जदाराचं वय 24 जुलैला 60 वर्शापेक्षा जास्त नको. उमेदवाराकडे पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचा कमीत कमी 25 वर्षांचा अनुभव हवा. यात सचिव स्तर किंवा समकक्ष पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्या व्यक्तींकडे भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्युटचा कमीत कमी 25 वर्षांचा अनुभव हवा.

पुन्हा पेट्रालचे दर झाले कमी, 'हे' आहेत आजचे भाव

इतका असेल पगार

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नर पदासाठी 2.25 लाख रुपये महिना पगार आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे 19 ऑगस्ट 2019.

या प्रसिद्धी पत्रकात हेही म्हटलंय की, वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती (FSRASC) योग्य व्यक्तीची शिफारस करू शकते.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत लंडन, 'हे' आहे मुंबईचं स्थान

दरम्यान,केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय. त्याबद्दल अनेक स्तरांवर विरोधही झाला. त्यामुळे असेल कदाचित, सरकार एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सातवा वेतन आयोग हा शेवटचा असू शकतो. आता यापुढे आठवा वेतन आयोग असणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहाचा प्रवेश सोपा नाही, 'हे' आहेत कठोर नियम

मग आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार ठरवायला आयोग असणार नाही, तर मग तो कसा ठरणार? तर सूत्रांच्या माहितीनुसार त्यासाठी नवी पद्धत वापरली जाणार आहे. काही अधिकाऱ्यांकडून कळलेल्या माहितीनुसार या नव्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित केला जाईल.

या नव्या आयक्राॅइड पद्धतीत पगारवाढ ही तुमची कामगिरी आणि चलनवाढीवर अवलंबून असेल. सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होणाऱ्या चढउतारीचाही परिणाम या पगारवाढीवर होईल. पण महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचा परफाॅर्मन्स पाहिला जाईल. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही कडक पावलं उचललीयत.

VIDEO: शपथ घेणारे तरी त्या पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 2, 2019 12:01 PM IST

ताज्या बातम्या