विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मोदी सरकार पाठवत आहे 7 लाख रुपये? वाचा काय आहे सत्य

विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मोदी सरकार पाठवत आहे 7 लाख रुपये? वाचा काय आहे सत्य

युट्यूब (YouTube) वर व्हायरल होणाऱ्या एका बातमीत असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार 'जीवन लक्ष्य योजने'अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर (Viral News on Social Media) विश्वास ठेवल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. दरम्यान सध्या युट्यूबवर (YouTube) एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. या बातमीत असे म्हटले आहे की केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदतीसाठी 7 लाख रुपये ट्रान्सफर करत आहे. 'जीवन लक्ष्य योजना' (Jeevan Lakshya Scheme)  सरकारकडून राबवली जात असून त्या अंतर्गत हे पैसे पाठवले जात असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. दरम्यान ही संपूर्ण बातमी खोटी (Fake News) असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर नागरिकांना फसवण्यासाठी अशा अनेक बातम्या व्हायरल होत आहेत, याबाबत जागरुग राहणे नागरिकांचे कर्तव्य आहे.

काय आहे व्हायरल बातमी?

या व्हायरल झालेल्या बातमीत असे म्हटले आहे की, केंद्र सरकार 'जीवन लक्ष्य योजने'अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 7 लाख रुपये पाठवत आहे. पीआयपी फॅक्ट चेकच्या (PIB Fact Check) अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पीआयबीने असे म्हटले आहे की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. सरकारची अशी कोणतीही योजना नाही आहे.

याआधी देखील अशीच एक खोटी बातमी व्हायरल होत होती. ज्यात असे म्हटले होते की, 'केंद्र सरकारकडून मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये ट्रान्सफर केले जातात असं सांगितलं आहे. हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. केंद्राने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. एका यूट्यूब व्हिडीओमध्ये कन्या सन्मान योजना (Kanya Sanman Yojna) या स्कीम अंतर्गत मुलींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2500 हजार रुपये भरले जातात असा दावा करण्यात आला. पण हा व्हिडीओ खोटा असून त्यावर सामान्य माणसांनी विश्वास ठेवू नये.’

(हे वाचा-ग्राहकांना मोठा झटका! या खाजगी बँकांनी घटवले FD वरील व्याजदर, वाचा नवे रेट्स)

पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते?

PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 17, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading