Home /News /money /

मोठी बातमी! बँक बुडाली किंवा बंद झाली तर 90 दिवसात खातेधारकांना मिळेल 5 लाखापर्यंत विमा

मोठी बातमी! बँक बुडाली किंवा बंद झाली तर 90 दिवसात खातेधारकांना मिळेल 5 लाखापर्यंत विमा

बँक बंद झाल्यास खातेधारकाला 90 दिवसांच्या आतमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याबाबतच्या डीआयसीजीसी कायद्यातील सुधारणेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 28 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet Meeting) बैठकीमध्ये बुधवारी अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत DICGC कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे. आता या संदर्भातील बिल संसंदेत मांडले जाईल. यानंतर जर एखादी बँक बुडाली तर ग्राहकांना विम्याची रक्कम 90 दिवसांच्या आतमध्ये मिळून जाईल. किती मिळेल विम्याची रक्कम? बँक बंद झाल्यास खातेधारकाला 90 दिवसांच्या आतमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याबाबतच्या डीआयसीजीसी कायद्यातील सुधारणेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी याबाबत माहिती दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशन (DICGC) कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी अशी माहिती दिली की आज इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशन (amendment) बिल, 2021 ला मंजुरी देण्यात आली. त्यांनी असे म्हटले आहे की, यामुळे विम्याची मर्यादा वाढेल आणि याअंतर्गत 98.3 टक्के बँक खातेधारक कव्हर होत आहेत. हे बिल संसदेच्या मान्सून सत्रात मांडण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे खातेधारक आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशासंदर्भात सुरक्षा मिळेल. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर जर एखाद्या खातेधारकाची बँक बुडाली तर त्याला 90 दिवसांच्या आतमध्ये विम्याची रक्कम मिळेल. यामध्ये ग्रामीण भागातील बँकांसह सर्व कमर्शिअली ऑपरेट होणाऱ्या बँकांचा समावेश आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Nirmala Sitharaman

    पुढील बातम्या