Elec-widget

देशातील बँकांची 6 महिन्यांत 95 हजार 760 कोटी रुपयांची फसवणूक, अर्थमंत्रालयाने दिली माहिती

देशातील बँकांची 6 महिन्यांत 95 हजार 760 कोटी रुपयांची फसवणूक, अर्थमंत्रालयाने दिली माहिती

मोदी सरकारने भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. बँक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने एकूण 3. 38 लाख बँक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : मोदी सरकारने भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. बँक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने एकूण 3. 38 लाख बँक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ही माहिती दिलीय. बँकांकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन सरकारने बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. 2015 ते 2017 या काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नोटबंदीच्या काळाचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये 4 हजार 641, 2016 मध्ये 3 हजार 232 आणि 2017 मध्येही बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. या आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यांमध्ये सुमारे 95 हजार 760 कोटी रुपयांचे बँक गैरव्यवहार समोर आले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या काळात 5 हजार 743 प्रकरणं समोर आली आहेत.

बँक घोटाळ्यांवर कारवाई

बँकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने मोठी पावलं उचलली आहेत. यामध्ये बँक खाती बंद करण्याच्या कारवाईचाही समावेश आहे. पंजाब महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेसारख्या घोटाळ्यामुळे अनेक खातेदार अडचणीत सापडले आहेत. खातेदारांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळणंही कठीण झालं आहे आणि बँकांचे गैरव्यवहार मात्र वाढत चालले आहेत. त्यामुळेच बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे)

==================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bankmoney
First Published: Nov 20, 2019 07:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com