मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? नव्या बजेटमध्ये खतांवर सब्सिडी देण्याचा प्रस्ताव

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? नव्या बजेटमध्ये खतांवर सब्सिडी देण्याचा प्रस्ताव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2.25 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाची शिफारस केली जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2.25 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाची शिफारस केली जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2.25 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाची शिफारस केली जाऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

लक्ष्मण रॉय, प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. पीएम किसान निधी ही तर महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये दिले जातात. लवकरच आता बजेटमध्ये खतांच्या सब्सिडीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत CNBC आवाजने महत्त्वाची बातमी दिली आहे.

सीएनबीसी आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2.25 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाची शिफारस केली जाऊ शकते. गेल्या वर्षभरात आयात युरियाच्या किमती 135 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर डीएपीच्या किमती 65 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

खत मंत्रालयाने अनुदानाची शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. अर्थसंकल्पात खतावर अनुदान जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय गॅसच्या दरवाढीमुळे खत कंपन्यांचा खर्च वाढला, त्यामुळे कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकार अनुदान जाहीर करू शकते.

अनुदान वाढवण्यासाठी खत मंत्रालयाने सल्ला मसलत केली आहे, पुढील व्यावसायिक वर्षासाठी आम्हाला अनुदानाचे पैसे अधिक लागतील, अशी त्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालय केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित भागधारकांशी संवाद साधते.

बजेट तयार करण्याआधी सल्लामसलत करणे हा त्याचा हेतू आहे. याअंतर्गत खत मंत्रालयाने 2.25 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या गॅसच्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शेतकऱ्यांना खतांवर मोठी सब्सिडी मिळाली तर त्याचा पिकांसाठी मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय वाजवी दरात शेतकऱ्यांना खतं उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे  याबाबत काय निर्णय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published: