एजंट स्मिथपासून राहा सावधान, नाही तर एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

एजंट स्मिथपासून राहा सावधान, नाही तर एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

Agent Smith, Viras - तुमच्या मोबाइल फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप असेल तर ही सावधगिरी बाळगा

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : आपल्या सगळ्यांच्याच फोनमध्ये आपापल्या बँकांचं अ‍ॅप असतं. मोबाइलवरून एका मिनिटात बँकेचे व्यवहार होत असतात. पण तुमचा अँड्राॅइड फोन सारखा हँग होतोय का? तुम्हाला सारख्या आर्थिक गुंतवणुकीच्या जाहिराती येतात का? असं होत असेल तर तुम्हाला मोठा धोका आहे. मग समजा की तुमच्या फोनमध्ये एजंट स्मिथ शिरलाय. त्यानं तुमच्या फोनवर हल्ला केलाय. हा एक व्हायरस आहे. तो फोनमध्ये शिरून सगळे नकली वर्जन इन्स्टाॅल करतो आणि तुमचे बँकेचे सगळे डिटेल्स मिळवतो. नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन ऑफ इंडियानं सर्व बँकांना एक ग्राहकांना सावध करायलाही सांगितलंय.

कोण आहे एजंट स्मिथ?

1999मध्ये हाॅलिवूडचा अ‍ॅक्शनपट आला होता, मेट्रिक्स. त्यात एजंट स्मिथ ही व्यक्तिरेखा होती. तो व्हायरस होता. मेट्रिक्सची पूर्ण सिस्टिम बिघडवून टाकायचा. तेच नाव या व्हायरसला दिलंय. सायबर सिक्युरिटी फर्म चेक पाॅइंटच्या संशोधनाप्रमाणे एजंट स्मिथनं जगभरातल्या एंड्राॅइड फोन्सवर हल्ला केलाय. भारतातल्या 1.5 कोटी फोन्समध्ये हा एजंट स्मिथ घुसलाय.

पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, 'या' 3 प्रकारे तुम्हीही पाहू शकता रोजच्या किमती

कसा करायचा सामना?

उपयोगी नसलेले अ‍ॅप्स फोनमध्ये इन्स्टाॅल करू नका

असे अ‍ॅप्स असतील तर ते डिलिट करा

फोनवर उगाचंच जाहिराती येत असतील तर व्हायरस स्कॅन करा

BCCI ला दुपारी 2 वाजता झाली जगातल्या अव्वल महिला क्रिकेटरच्या वाढदिवसाची आठवण!

फोनमध्ये व्हायरस असल्याचा मेसेज येत असेल तर फोन फाॅरमॅट करा

तुमचं सोशल अकाउंट, बँक अकाउंट यांचे पासवर्ड बदलत रहा

कुठलंही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरशिवाय डाउनलोड करू नका

अ‍ॅप खरं आहे की खोटं हे तपासून पाहा

त्यासाठी स्पेलिंग चेक करा

मोबाइल गेमचा पराभव लागला जिव्हारी, पुण्यात तरुणानं केली आत्महत्या

अ‍ॅप बनवणाऱ्याचं नाव पाहा

अ‍ॅपचा स्क्रीन शाॅट नीट लक्षात ठेवा

डाउनलोड करण्याआधी अ‍ॅपचा रिव्ह्यू वाचा

NPCI नं सांगितलंय की बँकिंग अ‍ॅप फक्त प्ले स्टोअरवरूनच डाऊनलोड करा. बँक अ‍ॅपचा पासवर्ड बदलत राहा. गुगल प्ले स्टोअरमध्ये जवळजवळ 50 हजार नकली अ‍ॅप आहेत. त्यामुळे कुठलंही अ‍ॅप डाउनलोड करताना सावध राहा, असाही सल्ला दिलाय.

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड; पुलालगतचा रस्ता गेला वाहून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 01:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading