नवा मोबाईल घेणार असाल तर 'ही' बातमी आधी वाचा

नवा मोबाईल घेणार असाल तर 'ही' बातमी आधी वाचा

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किमती होणार स्वस्त जाणून घ्या काय आहे कारण.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या किमती लवकरच स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. वाढत्या मागणीमुळे केंद्र सरकारकडून आता उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारकडून उत्पादनासाठी विशेष सुविधा, योजना राबवल्या जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. सरकार इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 ते 7 टक्के इन्सेंटीव देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारकडून उत्पादनावर 5 ते 7 वर्षांसाठी इन्सेंटीव देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईलसारख्या वस्तुंचं उत्पादन मागणीप्रमाणे वाढत राहिल आणि परिणामी या वस्तूंची किंमत कमी होईल असा एक कयास सांगितला जात आहे. सध्या आपल्याकडे भारतात मोबाईल आणि टीव्हीचं उत्पादन फार कमी होत आहे. याचे पार्ट्स इतर देशात तयार केले जातात आणि भारतात ते असेंबल केले जात असल्यामुळे केंद्र सरकारला त्यासाठी होणारा खर्च हा अधिक आहे आणि ग्राहकांची दरवर्ष वाढणारी मागणी लक्षात घेता केंद्र सरकारनं उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्कीम आणली आहे. सर्वाधिक टीव्ही आणि मोबाईल वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जवळपास दरवर्षी लोक आपला मोबाईल बदलतात त्यामुळे मोबाईलची मागणी जास्त आहे. मोबाईल आणि टीव्हीसारख्या वस्तुंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतात सुरू झालं तर त्याच्या किमतीही कमी होतील त्यामुळे केंद्र सरकारला जास्त फायदा होऊ शकतो.

वाचा-अंतराळात दारूचं दुकान! मंगळावर माणसाच्या आधी पोहचणार बिअर

इंटर मिनिस्ट्रीयल ग्रूपकडून ह्या योजनेबाबत शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये रोजगार, उत्पादन क्षमता, एकूण उत्पादन आणि विस्तार यावर आधारीत इन्सेंटीव देण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्र सरकारकडून त्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. या योजनेमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तुंचं उत्पादन आणि निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. निर्यातीमधून भारताला नफा मिळू शकतो त्यामुळे या योजनेवर उद्योग आणि अर्थ मंत्र्यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात मांडला जाण्याची शक्यता आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाला तर भारतात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनाला विशेषत: मोबाईल

टीव्हीसाठी चालना मिळेल आणि पर्यायाने रोजगार उपलब्ध होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या