फोनमध्ये इंटरनेट नाही? तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे

फोनमध्ये इंटरनेट नाही? तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे

Mobile Banking, Internet - तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेट नाही आणि तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचेत. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : हल्ली सगळेच जण इंटरनेट वापरतात. आपली सर्वच कामं इंटरनेटवर अवलंबून असतात. मोबाइल बँकिंग हेही अनेक अत्यावश्यक गोष्टींपैकी एक. पण आता तुम्ही तुमचे पैसे  इंटरनेटशिवायही ट्रान्सफर करू शकता. तुम्ही फोनवरून एक नंबर डायल करून आर्थिक व्यवहार करू शकता.

यासाठी National Unified USSD Platform नावची एक सुविधा उपलब्ध आहे. ती मोठ्या कव्हरेजसोबत अशी सुविधा उपलब्ध करून देते. National Payments Corp. of India (NPCI)नं 2012 मध्ये ही सुविधा सुरू केली होती. 2014मध्ये या सेवेचं कव्हरेज वाढवलं. ही सेवा Unstructured Supplementary Service Data (USSD) कम्युनिकेशन प्रोटोकाॅलवर काम करते. या टेक्नाॅलाॅजीद्वारे एक मोबाइल फोन आणि नेटवर्कमध्ये एक अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅममध्ये टेक्स्ट मेसेजची देवाणघेवाण होते. ही  सेवा Global System for Mobile (GSM) वर काम करते.

स्वस्त सोनं खरेदी करायची संधी, 'ही' आहे मोदी सरकारची खास योजना

NUUP Service UPI (Unified Payments Interface) वर सर्व बँका आणि टेलिकाॅम सर्विसेस एकत्र येतात.

यासाठी तुम्हाला *99# डायल करायला हवं. तुमच्या स्क्रीनवर वेलकम स्क्रीन येईल. त्यावर सात पर्याय येतील. Send money, Request money, Check balance, My profile, Pending requests, Transactions आणि UPI PIN.

World Cup: टीम इंडियाला अलर्ट रहावे लागेल; धावांचा पाठलाग करताना अशा आहेत अडचणी!

Send money सिलेक्ट करून मोबाइल नंबर, पेमेंट अ‍ॅड्रेस, सेव्हड बेनिफिशियरी किंवा IFSC कोड आणि अकाउंट नंबराच्या मदतीनं पैसे ट्रान्सफर करू शकता.

क्रिकेटविश्वाची नजर मॅंचेस्टरवर; आज काय होणार, 'हे' आहेत ताजे अपडेट

कधी कधी गावांत दूरगामी भागांत इंटरनेट कनेक्शन मिळत नाही. अशा वेळी भीम अ‍ॅपचं हे फीचर खूप उपयोगी आहे. यामुळे फंड ट्रान्सफर करणं सोपं जातं.

या सेवेची खास बात म्हणजे ज्या व्यक्ती ही सेवा वापरत नाही, त्यांनाही तुम्ही पैसे पाठवू शकता. फक्त तुमचा नंबर तुमच्या बँकेत मोबाइल बँकिंग सेवेसाठी रजिस्टर्ड हवा.

या सुविधेतून तुम्ही 5 हजार रुपयांपर्यंत फंड ट्रान्सफर करू शकता. बँक याचा सर्विस चार्ज घेत नाही. पण टेलिकाॅम आॅपरेटर त्याचा चार्ज घेईल.

VIDEO: 'दुष्काळात तेरावा महिना', मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 01:36 PM IST

ताज्या बातम्या